नांदेड (Dhangar Reservation) : भारतीय संविधानाने धनगर समाजाला घटनात्मक दिलेल्या आरक्षणाची ७५ वर्षानंतरही अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ भिम प्रहार नांदेड जिल्हा संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर १५ ऑक्टोबर रोजी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासून धनगर समाज गावकोसा बाहेरच आहे. भारतीय संविधानाने (Dhangar Reservation) धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले आहे. ते घटनात्मक आरक्षण ७५ वर्षापासून दिले जात नाही. संविधानिक मार्गाने धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी भिम प्रहार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी श्याम निलंगेकर, अंकुश ढेंबरे, बाळासाहेब कोळसे, संजय वाघमारे, विनोद वाघमारे, नारायण बकाल, सटवाजी डाके, राजेश पांढरे, ज्ञानेश्वर खराबे, मल्लू मालगोंडा परशुरे, सम्यक खोसले, कैलास मानेकर यांच्यासह अनेकांचा सहभाग होता.