भिवापूर (Bhivapur Farmer) : आज दुपारी दिड वाजताचे सुमारास वीजेच्या गडगडाटसह (Bhivapur Farmer) भिवापूर तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला.त्यातच वीज कोसळून पांजरेपार येथील शेतक-याचा (Bull killed) एक बैल ठार झाला. यात शेतकऱ्याचे ८० हजार रुपयाचे नुकसान झाले. ही घटना नांद – पांजरेपार परिसरात आज दुपारी १.३० वाजताचे सुमारास घडली. दुपारच्या सुमारास नांद-पांजरेपार परिसरात एक तास (Heavy Rain) जोरदार पाऊस पडला.
नांद शिवारातील घटना
माहितीनुसार, नांद शिवारात वादळ वारा व विजेच्या गडगडाटासह आज (Heavy Rain) जोरदार पाऊस झाला. पांजरेपार परिसरात तुळशीदास नामदेव इंगोले यांच्या शेती असलेल्या बैलांवर वीज कोसळल्याने (Bull killed) बैल ठार झाला. यात शेतकऱ्याचे ८०हजाराचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला (Bhivapur Farmer) अविलंब नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपचे भास्कर इंगळे यांनी केली आहे.