मृतांमध्ये मध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचाही समावेश
भिवापूर (Bhiwapur Accident) : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील तास गावाजवळ आज दुपारच्या बारा वाजताच्या सुमारास ट्रॅव्हल्स व ट्रक यांचा अपघात झाला. या अपघातातील मृतांची ओळख पटली असून पोलिसांनी त्यांची नावे जाहीर केली आहेत. जसवंत वसंतराव बावनकर वय 55 वर्ष राहणार उमरेड काम जलसंपदा कालवा निरीक्षक नागभिड, संजय योगेश्वर सोनकुसरे वय 48 वर्ष धंदा मजुरी राहणार नागपूर, सुरेखा अंकुश ठवरे वय 42 वर्ष धंदा शेतमजुरी राहणार नाड तालुका भिवापूर (Bhiwapur Accident), नैतिक जितेंद्र मडावी वय 14 वर्षे काम शिक्षण राहणार कन्नड गाव तालुका सिंदेवाही असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
येथे CLICK करा : ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू तर तब्बल 22 जखमी…बघा VIDEO
जखमींमध्ये समीक्षा वसंता धारणे वय १० वर्ष राहणार भिवापूर (Bhiwapur Accident), शालिक अर्जुन कुंबरे वय 35 राहणार चंद्रपूर, अल्केश श्याम कुमार तिवाडे वय 45 वर्ष राहणार उमरेड ,मारुती अर्जुन लांजेवार वय 60 वर्ष राहणार नागपूर , शोभा रामकृष्ण गजभिये वय 60 वर्ष राहणार मोहाडी तालुका नागभीड , रवी मोतीराम वाघमारे वय 45 राहणार भिवापूर ,पौर्णिमा निकुरे वय 25 राहणार आवळगाव तालुका नागभीड ,प्रिया नंदलाल पटेल 21 वर्ष राहणार शिंदेवाही, भारती अभय गजघाटे व 17 वर्षे राहणार नागपूर ,अनुराग महादेव सेलोरे वय 22 वर्ष राहणार नागभीड, प्रमोद मारुती बीजेवार वय 53 वर्ष राहणार सिंदेवाही, सुदाम उडकुजी मेश्राम व 68 वर्ष सिंदेवाही,केशरमाला शालिक कुंभारे वय 40 वर्ष, आदित्य शालीक कुंबरे वय सात वर्ष आदर्श शालीन कुंबरे वय पाच वर्ष हे सर्व रहिवासी पात्री तालुका सावली जिल्हा चंद्रपूर) यांचा समावेश आहे.
अपघातानंतर (Bhiwapur Accident) दोन मृतकांची पोलिसांना ओळख पटली होती मात्र दोन मृतकांची ओळख न पटू शकल्याने त्यांनी सोशल मीडियावर माहिती देऊन संबंधित वृत्तकांना ओळखल्यास संपर्क साधण्याचे आवाहन ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी केले होते.