चालक व वाहक दोघेही वाहून गेल्याची घटना
भिवापूर (Bhiwapur Heavy rain) : तालुक्यातील उमरेड गिरड या मार्गावरील चिखलापर गावाजवळ असलेल्या पुलावरून (Truck swept away) एक ट्रक वाहून गेला. या (Chikhlapar) घटनेत चालक व वाहक दोघेही वाहून गेले आहेत. ही घटना आज साडेचार वाजता च्या दरम्यान घडली.
वाहक व चालकाचा शोध घेणे कठीण
पुलावर तीन ते चार फूट पुराचे पाणी असतांना ट्रक चालकाने ट्रक काढण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या पुलामध्ये ट्रक आल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाने (Truck swept away) ट्रक नदीमध्ये वाहत गेला. यामध्ये नदीच्या दोन्ही बाजूने दोन ते तीन किलोमीटर परिसरामध्ये पाणी असून वाहक व चालकाचा शोध घेणे कठीण झाले. प्रशासनाला याची माहिती देण्यात आली असून, (Bhiwapur bridge) पुढील तपास सुरू आहे. ट्रक उमरेडकडून हिंगणघाटकडे जात होता.