दिवसाढवळ्या चोरी झाल्याने खळबळ
मालेवाडा (Bhiwapur Police) : भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत टाका गावामध्ये आज 13 अगस्त रोजी दिवसाढवळ्या 80 हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनसार जनाबाई सूर्यभान आंबेडारे वय ७० वर्ष राहणार टाका ह्या त्यांचे पती सून नातीन सोबत गावात राहतात. त्यांच्या कडे दोन एकर शेती व म्हशी आहेत. आज त्यांचे पती म्हशी चारायला गेले होते. जनाबाई व सून शेतावर गेल्या होत्या. दुपारी तीन वाजताच्या सुमारास जनाबाईची नातीन शाळेतून घरी आली असता घराचे कुलूप तुटलेले दिसले व घरात सुटकेस व इतर साहित्य अस्ताव्स्त पडून आढळले त्यानंतर या प्रकाराची माहिती तिने जनाबाईला दिली असता घरी येऊन चौकशी केल्यानंतर घरातील 80 हजार रुपये रोख व दोन ग्रॅम चे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे आढळले. दरम्यान (Bhiwapur Police) भिवापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल वृत्त लिहीस्तोवर घटनास्थळी चौकशी करीत होते.
