पोलिस अधिक्षक व आबकारी विभागाच्या अधिक्षकांना निवेदन
तिरोडा/गोंदिया (Bhiwapur Prohibition Case) : तालुक्यातील भिवापूर येथे दारूबंदीचा घेवून चांगलेच वातावरण तापले आहे. १५ ऑगस्ट रोजी तातडीने महिला ग्रामसभा आयोजित करून सर्वानुमते दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान ठरावाची प्रत तिरोडा पोलिस ठाण्याला पाठवून दारूबंदीसाठी सहकार्य करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यातच आता दारूबंदीच्या (Prohibition Case) मागणीला घेवून भिवापूर येथील शिष्टमंडळ जिल्हा पोलिस अधिक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांना भेटून निवेदन दिले. त्यामुळे भिवापूर येथील दारूबंदीचा प्रस्ताव आता वरिष्ठांच्या दरबारी पोहोचला आहे.
भिवापुर गावात दारूविक्री सुरू असल्याने गावातील शांतता धोक्यात आली होती. तरूण व्यसनाच्या आहारी गेले होते. मद्यपींचा धिंगाण्याने घराघरात तंटे व कलह निर्माण होऊन भांडण वाढू लागले. यामुळे गावातील शांतता आणि महिलांमध्ये त्रास सहन करावा लागत होता. चौकाचौकात दारूड्यांची मैफिल जमत असते. यामुळे मुली, विद्यार्थी व महिलांना अडचणीचा सामना करून त्रास सहन करावा लागत होता. या प्रकाराला कंटाळून महिलांनी (Prohibition Case) दारूबंदीसाठी एल्गार पुकारला. १४ ऑगस्ट रोजी ग्राम पंचायती अर्ज करून दारूबंदीची मागणी करण्यात आली. यानुसार १५ ऑगस्ट रोजी ग्राम पंचायतीच्या वतीने तातडीने महिला सभेचे आयोजन केले.
या सभेत मोठ्या संख्येत महिला-पुरूषांनी हजेरी लावली. दरम्यान सर्वांचे अभिप्राय नोंदवून (Prohibition Case) दारूबंदीच्या मागणीवर विचार करण्यात आला. यातून दारूविक्रीमुळे गावातील वातावरण ढवळून निघत असून शांतता धोक्यात येत आहे. तसेच गावातील युवक दारूच्या आहारी जात असल्याचे निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार सर्वानुमते दारूबंदीचा निर्णय घेत भिवापुर येथे दारूबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला. ठरावाची प्रत तिरोडा पोलिस स्टेशन येथे पाठवून गावात दारू विक्री करणारे किंवा चौकात दारू पिऊन शांतता भंग करणार्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यातच आता दारूबंदीच्या मागणीला घेवून भिवापूर येथील सरपंच राजकुमार ठाकरे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधिक्षक व राज्य उत्पादन शुल्काचे अधिक्षक यांची भेट घेवून दारूबंदीसाठी सहकार्य करावे, अशी मागणी केली. त्यामुळे वरिष्ठ भिवापूर येथे दारूबंदीला घेवून कोणती भुमिका घेतात. याकडे गावकर्यांचे लक्ष लागले आहे.
शिवाय ग्राम पंचायतीच्या वतीने गावात दारूविक्री करणे, दारू पिऊन शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. निवेदन देताना शिष्टमंडळात सरपंच राजकुमार ठाकरे, पोलीस पाटील कैलास रामटेके, ग्राम पंचायत सदस्य अनिल रामटेके, रेखालाल हरीनखडे, दारूबंदी महिला अध्यक्ष भारती पटले, उपाध्यक्ष मुनीताई कोहडे, गीता बिसेन, कल्पना हरीणखडे, नलिनी मेश्राम, बाली सुरणकर, भूमेश्वरी उईके, हेमलता नेवारे, माधुरी मेश्राम, कविता ठाकरे, निर्मला ठाकरे, आणि अनेक महिला उपस्थित होत्या.