परभणी/गंगाखेड (Bhoi Samaj) : गोदावरी नदीला अचानक आलेल्या पुरात नदी पात्रात सोडलेले जाळे, होडी व अन्य साहित्य वाहून गेल्याने मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून गंगाखेड तालुक्यातील मच्छीमारांना (Bhoi Samaj) आर्थिक मदत देण्याची मागणी मच्छीमार बांधवांच्या वतीने दि. ६ सप्टेंबर रोजी तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
आठवडा भरापूर्वी दि. ३१ ऑगस्ट ते दि. २ सप्टेंबर रोजी गंगाखेड तालुक्यात सर्वदूरपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात तालुक्यातील मैराळसावंगी, चिंचटाकळी, महातपुरी, खळी, दुस्सलगाव, गंगाखेड, मसला, नागठाणा आदी गावातील (Bhoi Samaj) भोई समाज बांधवांनी मच्छीमारीसाठी नदी पात्रात सोडलेले जाळे, होडी व अन्य साहित्य वाहून गेल्याने मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटातून बाहेर पाडण्यासाठी हलाखीचे जीवन जगणाऱ्या मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील मच्छीमार समाज बांधवांनी ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रदेशाध्यक्षा संगीता कचरे यांच्या माध्यमातून तहसीलदार उषाकिरण श्रंगारे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनावर सोपान कचरे, यशोदा गहिरे, सय्यद दस्तगीर, मुक्ताबाई बिजले, नवनाथ कचरे, शेख साजीद, विठ्ठल भुंगासे, मुंजाभाऊ गव्हाणे, देवमन कचरे, शेख बाबू, संगीता गहिरे, शेख मन्सूर, शोभा कचरे, दिगंबर लकारे, राम गहिरे, जावेद शेख, मारोती लकारे, हबीब पठाण, महादू लकारे, शेख समीर, नवनाथ गहिरे, शेख नुर, हनुमान परसे, सलीम शेख, सोपान लकारे, अफजल शेख, रोहिदास गहिरे, नवनाथ केते, फिरोज शेख, ओम गहिरे, शेख अखिल, सुभाष गहिरे, शेख खलील आदींसह बहुसंख्य मच्छीमार व (Bhoi Samaj) भोई समाज बाधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.