भंडारा (Bhojapur Accident) : शहरालगतच्या भोजापूर येथे दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता दरम्यान हृदयदायक व धक्कादायक घटना (Bhojapur Accident) घडली. शाळेत जाणार्या सायकलस्वार विद्यार्थ्यास एका व्हॅनने चिरडले. त्यात ९ वर्षीय विद्यार्थी जागीच गतप्राण झाला. आदी रुपचंद बागडे रा. भोजापूर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
भोजापूर येथील आदी बागडे हा संत शिवराम शाळेचा विद्यार्थी होता. तो दि.१ ऑक्टोबर रोजी सकाळी आपल्या सहकारी मित्रांसोबत सायकलने गावात फिरत असताना गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर रस्त्यावर विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी व्हॅन क्र. एम.एच.३६/एच.८४८६ चा चालक सुरज कडनाईक (२०) रा. गिरोला याने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीस्वार विद्यार्थ्यास चिरडले. त्यात आदी बागडे गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाला.
अपघाताची माहिती गावात होताच नागरिकांनी घटनास्थळी तोबा गर्दी केली होती. भंडारा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. त्याच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Bhojapur Accident) सदर घटनेची नोंद भंडारा पोलिसात केली असून व्हॅनचालक विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि मडावी करीत आहेत. व्हॅनमधील काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पुढे येत आहे.