४ कोटी १३ लाख रुपयाचा निधी मंजूर
हिंगोली (Kayadhu river Dam) : कयाधू नदीच्या पात्रामध्ये बाराही महिने शंभर टक्के पाणी राहावे या उद्देशाने हिंगोली शहरात नदीवर बंधारा बांधण्याकरीता यापूर्वीच मंजुरी मिळाली होती. त्यामुळे शनिवारी या बंधार्याचे भूमिपूजन आमदार तान्हाजीराव मुटकुळे, आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले.
मागील काही वर्षापूर्वी कयाधू नदीच्या (Kayadhu river Dam) तिरावर असलेल्या स्मशानभूमीजवळ बंधार बांधण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. या बंधार्यासाठी ४ कोटी १३ लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आमदार तान्हाजीराव मुटकुळे, आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते बंधार्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, नगरसेवक गणेश बांगर, सुभाष बांगर, कैलास बांगर, उमेश नागरे, काशिनाथ बांगर, फुलाजी शिंदे, नारायण खेडेकर, अॅड.के.के.शिंदे, आशिष जैस्वाल, प्रकाश बांगर आदींची उपस्थिती होती. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी बोलताना हिंगोली शहरातला कयाधू नदीवरील हा शेवटचा बंधारा असून यापूर्वी पाच बंधार्याचे काम पूर्णत्वाला गेले आहे. (Kayadhu river Dam) कयाधू नदी शंभर टक्के भरून राहावी यासाठी हा बंधारा उभारला जात आहे. शहरातील सांडपाणी शुद्धीकरण करून कयाधू नदीत सोडले जाणार व या पाण्याचा फायदा स्मशानभूमीत आलेल्या लोकांना व्हावा हा उद्देश आहे. या बंधार्याचे काम पावसाळ्यापूर्वी केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.