मानोरा (Washim):- मानोरा पोलीस स्टेशन (police station)अंतर्गत येत असलेल्या मौजे भोयणी शेत शिवारात गावठी हात भट्टी दारूवर पोलीसांनी धाड टाकून ५३ हजार ५०० रुपयाचा मुद्दे माल जप्त केला.
३०० लिटर लीटर सडवा मोहामाच ड्रमसह किंमत ४५००० हजार रुपये जप्त
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी श्याम गोपीचंद आडे (वय ४५) यांचे शेत शिवारात पोलीसांनी प्रो रेड करुन ३५ गावठी हात भट्टी दारु ३५०० रूपये व ३०० लिटर लीटर सडवा मोहामाच ड्रमसह किंमत ४५००० हजार रुपये व दारु (alcohol) काढण्याचे इतर साहित्य ५००० हजार असा एकूण ५३, ५०० रुपयाचा चा प्रो माल पोलीसांनी जप्त केला. आरोपी शाम आडे यांचे विरूद्ध कलम ६५ ई फ महाराष्ट्र दारूबंदी कायदान्वये गुन्हा दाखल केला. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पडावी कारंजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे, डी बी पथक प्रमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल मदन पुणेवार, स. फौ. रविन्द्र राजगुरे, सुभाष महाजन, पोशी मनिष अगलदरे, यांनी केली