आखाडा बाळापूर (Hingoli):- कळमनुरी तालुक्यातील विविध भागात बुधवार रोजी सकाळी सव्वा सात वाजता भुकंपाचा धक्का (earthquake shock) बसला. या भुकंपाच्या धक्क्याने पेठवडगाव येथील प्राचीनकाळीन ऐतिहासिक किल्ल्याच्या (earthquake shock)बुरूजाचा काही भाग ढासळला. किल्ल्यावर पोलिस अधिकारी व पथकाने भेट देऊन नुकसान पाहणी केली दुपारपर्यंत प्रशासन कडून कोणी आले नव्हते.
कळमनुरी तालुक्यातील विविध गावात भुकंपाचा झटका
मागील काही वर्षापासून कळमनुरी व वसमत तालुक्यातील सीमेवरील गावात भुकंपाचे धक्के नेहमी बसतात तिन महिन्यापूर्वी तालुक्यातील विविध भागात भुकंपाचे धक्के बसले होते. यानंतर आज सकाळी कळमनुरी, आखाडा बाळापूर,वारंगाफाटा, शेवाळा, रामेश्वर तांडा, बोथी, पेठवडगाव, येहळेगाव, बोल्डा, पोत्रा, निमटोक, कवडी, कवडा, दांडेगाव, जवळापांचाळ, डोंगरकडा, रेडगाव,वडगाव, पिंपरी, आडा व तालुक्यातील विविध भागात सव्वा सात वाजता जमीन हादरून मोठा धक्का बसला यामुळे शेकडो नागरिक घरातून रस्त्यावर आले, शेकडो जण धक्क्याने झोपेतून खडबडून जागे झाले. या भुकंपाचा केंद्र बिंदू कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा ते पांगारा शिंदे भागात आहे. दरम्यान भुकंपाच्या धक्याने पेठवडगाव येथील प्राचीनकाळीन ऐतिहासिक किल्ल्याचा बुरूजाचा काही भाग ढासळून मोठा आवाज झाला आस सरपंच बालाजी देवकर, उपसरपंच सोमनाथ रणखांब यांनी सांगितले.
झोपेतून खडबडून नागरिक रस्त्यावर..
ऐतिहासिक किल्ल्याची जपवणूक व देखभाल करण्यासाठी शासनाने निधी व पावले उचलावी आसे जेष्टनेते माजी जि.प.सदस्य सुरेशराव वडगावकर यांनी सांगितले. दरम्यान आखाडा बाळापूर पोलीस निरीक्षक(police inspector) विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर नागरे, शिवाजी पवार, प्रवीण चव्हाण व पथकाने किल्ल्यावर भेट देऊन पाहणी केली. सकाळीच भुकंपाचा मोठा धक्का बसुन जमीन, पलंग हलले यामुळे झोपेत आसलेले बरेचजण खडबडून जागे होते रस्त्यावर आले.गावोगावी गल्लीत शेकडो जण रस्त्यावर येउन भुकंपाची चर्चा करत होते.