सचिव व सरपंच यांनी केला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार
मानोरा (Bhuli Gram Panchayat) : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे भुली येथील (Bhuli Gram Panchayat) ग्राम पंचायतचे सचिव व सरपंच यांनी १४ वा आणि १५ वित्त आयोगातील काही व इतर कामे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयांची उचल करत कामेही निकृष्ट दर्जाची केली आहे. सदरील कामाची इस्तिमेटनुसार उच्च स्तरीय चौकशी करून न्याय द्यावा, या मागणीसाठी दि. ५ ऑगस्ट पासून पंचायत समिती आवारात ग्राम रोजगार सेवक प्रकाश गुलाबराव चव्हाण यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे.
उच्च स्तरीय चौकशी करून न्याय द्यावा
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे (Bhuli Gram Panchayat) भुली ग्राम पंचायतचे सचिव व सरपंच यांनी भूमिगत गटार कामाचे जवळपास ३१ लक्ष खर्च दाखविला आहे. प्रत्यक्षात मात्र गावात कोठेही भूमिगत गटार बांधलेले नाही. पेवर ब्लॉक बसविण्याचे कामात भ्रष्टाचार केला असुन कोमल राठोड ते दिनेश चव्हाण यांच्या घरापर्यंत ३ लक्ष रूपये शासनाचा निधी घेतला असुन काम मात्र केलेला नाही.
यासह शौचालय व मुत्रिघर, पाणी पुरवठा अंतर्गत हातपंप बांधकाम व पेव्हड ब्लॉक, जिल्हा परीषद शाळेचे फर्निचर, सोलर अभ्यासिका, सोलर लायब्ररी, पाणी पुरवठा दुरुस्ती, गाव अंतर्गत रस्ता, आरोग्य कोरोना शिबिर, अंगणवाडी दुरुस्ती व गॅस सिलेंडर, जिल्हा परीषद शाळा रंगरंगोटी, जिल्हा परीषद शाळेचे वॉल कंपाऊंड, अंगणवाडी खेळणी व आवश्यक साहित्य खरेदी, महीला व पुरुषावर प्रशिक्षण खर्च, सोलर पथदिवे, जिल्हा परीषद शाळा डिजिटल खर्च, ग्राम पंचायत कार्यालय दुरुस्ती व रंगरंगोटी, दलीत वस्ती पाणी पुरवठा व पाइप लाईन दुरुस्ती, कचरा कुंडी, सिमेंट बाकडे खरेदी, सिमेंट काँक्रिट रस्ता यासह अनेक बाबीवर खर्च दाखवून लाखो रुपयांचा खर्च करून सचिव, सरपंच यांनी संगनमतीने भ्रष्ट्राचार केलेला आहे. याबाबत गांभीर्याने दखल घेत उच्च स्तरीय चौकशी करून दोषी विरुध्द फौजदारी गुन्हे दाखल करुन न्याय देण्याची मागणी उपोषण कर्ता चव्हाण यांनी केली आहे.
पंतप्रधान आवास घरकुल योजनेत गावात पक्षपात करण्यात आला असून गरजू गरीब, भूमिहीन व शेतमजुर नागरीकांना डावलून आपल्या मर्जीतील पक्के घर असणाऱ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर काही पक्के घर असणाऱ्या लोकांनी घरकुलाचे बांधकाम न करता शासनाची अनुदानित रक्कम घेतले असल्याचा आरोप उपोषण कर्त्यानी तक्रार निवेदनातून केला आहे.
मौजा भुली (Bhuli Gram Panchayat) येथील स्मशान भूमी कामात लाखो रुपये उचल केले आहे. मात्र काम झालेले नाही. याबाबत सचिव यांना माहिती अधिकारात माहिती माहिती मागीतली असता दिली नाही. तेंव्हा सदरील प्रकरण माहिती आयुक्त अमरावती कार्यालयात दाखल आहे.
सन २०१४ – १५ मध्ये तत्कालीन आमदार स्व प्रकाश डहाके यांच्या निधीतून श्री सेवालाल महाराज संस्थान भुली येथे २५ लक्ष रुपयाचे सभामंडपाचे निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. छतावरून पाणी गळत होते, तसेच ते दुरुस्तीही झाले असते. परंतु तसे न करता बांधकाम विभागाची परवानगी न घेता विद्यमान जिल्हा परिषदेच्या पती यांनी संपूर्ण छत जमीनदोस्त करून भुईसपाट केले आहे. याबाबतची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.