तिवसा शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन थाटात
अमरावती (Tivsa Water Supply Yojana) : तिवसा शहर वासियांना आता गढूळ पिण्याच्या पाण्यापासून मुक्ती मिळून घरो-घरी शुद्ध पिण्याचे पाणी पोहचणार आहे. सदर योजना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. त्यामुळे नागरिक गढूळ पाणी आणि अधिग्रहित विहिरीवरून होत असलेला (Water Supply Yojana) पाणीपुरवठा यावरच तहान भागवित होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. ॲड. यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांनीही अनेकदा आंदोलने करून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर सदर पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. आणि मंगळवारी या योजनेच्या कामाचे भूमिपूजन आ. यशोमती ठाकूर यांचे हस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडले.
आ. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांनी सुटल्या अनेक ज्वलंत समस्या
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत समर्थ नगरी तिवसा शहरासाठी महत्वाकांक्षी अशा परिपूर्ण (Water Supply Yojana) पाणीपुरवठा योजनेसह विविध विकास कामाचेही भूमिपूजन आमदार ॲड. यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्याचे खासदार बळवंतरावजी वानखडे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या भूमिपूजन सोहळ्याला सुरेशरावजी साबळे संचालक जि. म. सह बँक अमरावती, शिवदासजी मुसळे मुख्याधिकारी न.प. तिवसा, विलासभाऊ इंगोले माजी महापौर अमरावती महानगरपालिका, सत्येन पाटील उपविभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुकुंदराव देशमुख सचिव, जिल्हा काँग्रेस कमिटी अमरावती, प्रदीपभाऊ राऊत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती, सतीशभाऊ पारधी अध्यक्ष तिवसा तालुका काँग्रेस कमिटी, शेतुभाऊ देशमुख अध्यक्ष, शहर कॉग्रेस कमिटी तिवसा, कल्पनाताई दिवे सभापती पं.स. तिवसा, सुरेशराव मेटकर अध्यक्ष, ख.वि.सं. तिवसा, रविभाऊ राऊत सभापती कृ.उ.बा.स. तिवसा, रघुनाथजी वाडेकर उपाध्यक्ष जिनिग प्रेसिंग संस्था, शरदराव वानखडे सदस्य, पं.स. तिवसा, अमोलजी माळकर मुख्याधिकारी न.प. धामणगाव रेल्वे, दिलीपराव काळबांडे मा. जि.प. सभापती तथा उपाध्यक्ष जिल्हा कॉग्रेस कमिटी अम., शामभाऊ देशमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना (ऊ. बा. ठा) अमरावती जिल्हा, विलासराव माहोरे शिवसेना (ऊबाठा) तालुकाप्रमुख तिवसा, सुनिताताई अळसपुरे संचालिका महाराष्ट्र कापूस पणन महासंघ मुंबई, रोशनीताई पुनसे उपसभापती पं.स. तिवसा, सुरेशराव धवणे उपाध्यक्ष, ख.वि.सं. तिवसा, जयकांत माहोरे उपसभापती कृ.उ.बा.स. तिवसा, शिल्पाताई हांडे सदस्य, पं.स. तिवसा, निलेशभाऊ खुळे सदस्य, पं.स. तिवसा, अब्दुलभाऊ सत्तार सदस्य, पं.स. तिवसा, सुनीलभाऊ बाखडे कार्याध्यक्ष शहर कॉग्रेस कमिटी, दयानंद डेहनकर स्थापत्य अभियंता न.प. तिवसा, रुपालीताई काळे शहर अध्यक्ष महिला कॉग्रेस कमिटी, रोहन राठोड अधीक्षक न.प. तिवसा, अभिजित लोखंडे अभियंता पाणीपुरवठा न.प. तिवसा, योगेश क. वानखडे नगराध्यक्ष न.प. तिवसा, वैभव स. वानखडे मा. नगराध्यक्ष तथा स्विकृत, नगरसेवक न.प. तिवसा, किसन व. मुंदाणे सभापती, पाणीपुरवठा समिती तथा गटनेता, न.प. तिवसा, माधुरीताई ना. पुसाम सभापती, महिला व बालकल्याण समिती, न.प. तिवसा, अर्चनाताई ग. भोंबे नगरसेविका न.प. तिवसा, तृप्तीताई प्र. पडोळे नगरसेविका न.प. तिवसा, सीमाताई आ. खाकसे नगरसेविका न.प. तिवसा, मंगलाताई सु. बाखडे नगरसेविका न.प. तिवसा, अनिल रा. थुल नगरसेवक न.प. तिवसा, प्रियाताई न. विघ्ने उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती न.प. तिवसा, सचिन र. गोरे स्विकृत, नगरसेवक न.प. तिवसा, संगीताताई सु. राऊत सभापती, बांधकाम समिती, न.प. तिवसा, प्रितीताई दि. भुरभुरे नगरसेविका न.प. तिवसा, प्रतिभाताई ह. भगत नगरसेविका न.प. तिवसा, प्रतिभाताई गौरखेडे नगरसेविका न.प. तिवसा, नरेश वि. लांडगे नगरसेवक न.प. तिवसा, सुवर्णाताई अ. आमले नगरसेविका न.प. तिवसा, अमर पु. वानखडे नगरसेवक न.प. तिवसा, आशिष स. ढोले नगरसेवक न.प. तिवसा व् नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी (Water Supply Yojana) तिवसा शहराला पाणी वितरीत करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तिवसा व अमरावती तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन
मंगळवारी आमदार यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांच्या हस्ते तिवसा व अमरावती तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या अंतर्गत तिवसा तालुक्यातील सुरवाडी (खुर्द), शिरजगाव मोझरी, अमरावती तालुक्यातील वलगाव, नया अकोला, सालोरा (बु.), विठ्ठलापूर, सावर्डी, शेवती जहागीर, डवरगाव, कठोरा (बु.) येथे रस्ता सिमेंट क्राँक्रिटीकरण, सभागृह निर्माण, जोड रस्ते निर्माण आदी विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.