खा. संजय राऊत व प्रा. नरेश बोडखे यांच्या चर्चेतील सुर!
बुलढाणा (Sanjay Raut with Naresh Bodkhe) : वऱ्हाडला सोन्याची कऱ्हाड संबोधल्या जायचे, पांढरे सोने पिकवणाऱ्या कापसाचा हा प्रांत. परंतु सरकारच्या उदासीन शेतीविरोधी धोरणामुळे वऱ्हाडच्या सुजलाम सुफलाम भूमीतून पिकणाऱ्या शेतमालाला हमीभावाच्या दृष्टीने वाईट दिवस आले. विदर्भ म्हटला की पूर्व विदर्भात उद्योग गेले, त्यामुळे नागपूर म्हणजेच विदर्भ अशी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांची धारणा झाली, परिणामी पश्चिम विदर्भ असलेला अमरावती विभाग हा विकासात्मक अनुशेषाच्या दृष्टीने कायम दुर्लक्षित राहिला.
अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या. आता कुणीतरी येईल व वऱ्हाडाचा विकास करून देईल, या आशेवर न बसता वऱ्हाडातील लोकांनीच वराड प्रांताचे विकाससाठी पुढे आले पाहिजे.. असा सूर राज्यसभेचे खासदार तथा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) व आर्थिक क्षेत्रातील राष्ट्रीय विश्लेषण व गोखले इन्स्टिट्यूट अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नरेश बोडखे (Naresh Bodkhe) यांच्या चर्चेतून निघाला.
सामनाचे संपादक, शिवसेना(ऊबठा) पक्षाचे नेते, सडेतोड भूमिका मांडणारे प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत हे अकोला आले असता, प्रा. डॉ. नरेश बोडखे (Naresh Bodkhe) यांनी त्यांची भेट घेऊन पश्चिम विदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. पुढे याविषयांवर काम करण्याची संधी पक्ष मला नक्कीच देईल, अशी शाश्वतीही यावेळी खा. राऊत त्यांनी प्रा. बोडखे यांना दिली. विदर्भाच्या नावाखाली येणारे प्रकल्प, उद्योग, सोयी सुविधा या बहुतेक करून पूर्व विदर्भाकडे वळवल्या जातात आणि पश्चिम विदर्भ ज्याला आपण “वऱ्हाड” म्हणतो तो कायमच दुर्लक्षित राहतो. दुर्दैवाने येथील कुठल्याही नेत्याला या विषयाची जाण किंवा गांभीर्य दिसत नाही. म्हणूनच आता येथील भूमिपुत्रांनी वऱ्हाडाच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे, असा सूर या (Sanjay Raut) दोघांच्या चर्चेतून निघाला.