रिसोड (Bhumiputra Shetkari Sanghatana) : रिसोड शेतकऱ्यांची चळवळ असलेल्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वाशिम जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या हस्ते करण्यात आल्या. मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील विशाल बबनराव मोरे यांची वाशिम जिल्हा उपाध्यक्षपदी तर मालेगाव तालुक्यातील सोनाळा येथील नितेश शालिग्राम वानखेडे यांची मालेगाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
विशाल मोरे आणि नितेश पाटील यांच्या नियुक्तीमुळे मालेगाव तालुक्यात भूमिपुत्र शेतकरी संघटना वाढीसाठी मदत होणार असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना नेहमीच अग्रभागी असेते. भूमिपुत्र करियर अकॅडमीच्या माध्यमातून विशाल मोरे हे सातत्याने गेल्या पाच वर्षापासून जिल्ह्या वाशियांना परिचित आहेत.
भूमिपुत्र करिअर अकॅडमी बरोबरच सुशिक्षित व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भूमिपुत्र स्पर्धा परीक्षा बचाव समिती त्यांच्या माध्यमातून राज्यभर काम करीत आहे. तर सोनाळा येथील निलेश पाटील हे सामाजिक क्षेत्रात अग्रभागी असून गेल्या अनेक दिवसापासून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या संपर्कात होते व सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काम करत होते. या दोन्ही नेत्यांची भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री विष्णुपंत भुतेकर यांच्या हस्ते तर वाशिमचे जिल्हाध्यक्ष रामेश्वरजी अवचार, संतोष सुर्वे, रवींद्रजी चोपडे, बाळू भाऊ बरडे , विकास आवले, हरिभाऊ बाजाड, सचिन सदार, अल्पसंख्यांक सेल रिसोड तालुका अध्यक्ष रहमान भाई यांच्या उपस्थितीत नियुक्ती देण्यात आली.




