परभणी(Parbhani):- सेलूचे भूमीपूत्र तसेच येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि उपसचिव मंत्रालय (अन्न,नागरिक पुरवठा आणी ग्राहक संरक्षण)विभागाचे असलेले संतोष उमेशराव गायकवाड यांनी दक्षिण आफ्रिकेत (South Africa)झालेल्या धावण्याच्या स्पर्धेत 90 कि.मी. या प्रकारात ब्राँझ पदक मिळवून देशाचे आणि सेलू शहराचे नाव उंचावले आहे.
10 तास 09 मिनिटं इतक्या वेळात त्यांनी 90 किमी अंतर पूर्ण
दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन(Comrade Marathon) अल्टीमेट असोसिएशन यांच्यावतीने 11 जून रोजी आयोजित केलेल्या कॉम्रेड मॅरेथॉन अल्टीमेट ह्युमन रेस या धावण्याच्या स्पर्धेत 90 किमी धावणे स्पर्धेत संतोष गायकवाड यांनी ब्राँझ पदक (Bronze medal)मिळवले. 10 तास 09 मिनिटं इतक्या वेळात त्यांनी 90 किमी अंतर पूर्ण केले. मोठ्या प्रशासकीय पदावर असतांनाही संतोष गायकवाड यांनी धावण्याच्या स्पर्धेत पदक मिळवले ही अभिमानास्पद बाब आहे. आज असंख्य माणसे विविध आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी धावणे हा व्यायाम आवश्यक आहेच. परंतु, यासोबत जर जास्त सराव केला तर विविध स्पर्धेत भाग घेऊन नावही उंचावता येते हे गायकवाड यांनी सिद्ध केले आहे. यापूर्वीही विविध ठिकाणी झालेल्या धावण्याच्या स्पर्धेत संतोष गायकवाड यांनी अनेक पदक मिळवलेली आहेत. गेल्या वर्षी 10 तास 44 मिनिटात हे अंतर कापून ब्रांझ पदक मिळवीले होते.
धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवणारे संतोष गायकवाड हे परभणी जिल्ह्यातून एकमेव
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवणारे संतोष गायकवाड हे परभणी जिल्ह्यातून एकमेव आहेत हे विशेष. त्यांच्या या यशाबद्दल वडील उमेशराव गायकवाड, आई ए. यु. गायकवाड, बाळासाहेब गायकवाड,बहिण विद्या गायकवाड(आयुक्त,जळगांव,मनपा) श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अनिरुद्ध जोशी, सचिव महेश खारकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, आदींसह शाळेतील शिक्षक ,पुनमचंद खोना तसेच मित्र परिवाराने अभिनंदन (congratulations) केले.