हिंगोली (Hingoli Bazar Samiti) : नाणे टंचाई व मार्च एन्डमुळे येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचा (Hingoli Bazar Samiti) भुसाराचा मोंढा २६ मार्चपासून बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली आहे.
हिंगोलीतील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (Hingoli Bazar Samiti) यार्डामध्ये जिल्ह्यासह परजिल्ह्यातून अनेक शेतकरी आपला शेती माल विक्री करण्याकरीता आणत असतात. या ठिकाणी शेती मालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकर्यांचा ओढा हिंगोलीकडे अधिक असतो. सध्या शेती मालाची आवक कमी झालेली आहे. त्यातच ग्रेन्ड मर्चंट असोशिएशनच्या वतीने १८ मार्चला बाजार समितीला पत्र देण्यात आले.
ज्यामध्ये नाणे टंचाई व मार्चएन्डमुळे २२ मार्च शनिवारपासून संत नामदेव हळद मार्केट बंद ठेवण्यात आले असून २६ मार्च बुधवार पासून भुसाराचा मोंढा बंद ठेवण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे २६ मार्चपासून भुसाराचा मोंढा बंद ठेवला जाणार आहे. ३ एप्रिल गुरूवार पासून मोंढ्यातील सर्व व्यवहार सुरळीत चालू होतील. तसेच ३ एप्रिलपासूनच हळदीचा लिलाव सोमवार ते शुक्रवार या दरम्यान चालू राहणार असल्याची माहिती (Hingoli Bazar Samiti) बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली आहे.