वरुड (Bidkar sisters) : पुसला येथील शेतकरी महिला (Bidkar sisters) बिडकर भगिनींचे स्थानिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला नवव्या दिवशी यश आले असून उपवनसंरक्षक दिव्यभारती यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी (Forest officer) आणि वनपाल याना तीन महिन्याकरिता निलंबित केले. लिंबूपाणी देऊन उपोषण सोडविले.
तालुक्यातील पुसला येथील सुशीला आणि बेबी बिडकर (Bidkar sisters) यांचे पंढरी शेतशिवारात वडिलोपार्जित शेतीमधील पिकांचे जंगली प्राण्यांनी नुकसान केले.नुकसान भरपाई मिळावी म्हणून वनविभागाकडे निवेदन दिल्यानुसार घटनास्थळ पंचनामा करण्यात आला.परंतु (Forest Department) वनविभागाने मूळ पंचनामा बदलवून खोटा पंचनामा सादर करून नुकसानभरपाईची कमी रक्कम देण्यात आली होती. वनविभागाचे बिडकर भगिनीने दोन महिन्यापासून उंबरठे झिजविले परंतु न्याय मिळाला नव्हता.अखेर १० जून पासून स्थानिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले.या उपोषणाची नवव्या दिवशी दखल घेऊन उपवनसंरक्षक दिव्यभारती एम यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पलता बेंडे आणि वनपाल अनुप साबळे यांचेवर तीन महिने निलंबनाची कारवाही केली.
अखेर उपोषणकर्त्या (Bidkar sisters) बिडकर भगिनींच्या तिन्ही मागण्या मान्य करून अतिरिक्त नुकसान भरपाई,आणि निलंबनाची कारवाही पूर्ण केल्याने मंगळवारी रात्री उशिरा उपवनसंरक्षक दिव्यभारती, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी येऊन निलंबनाची प्रत देऊन उपोषण सोडविले. यावेळी (Forest Department) वनविभाग अन्याय निवारण कृती समितीचे सदस्य दिलीप भोयर,निळकंठ यावलकर,प्रा. कमलनारायण उईके, शिवनारायण अढावू, रवींद्र डोंगरे, गणेश कुसराम, चंद्रशेखर वरुडकर, नितेश उईके, दिपक देशमुख, सतीश सोनुले, ॲड.योगेश नागले, मनोज उईके, डॉ.अनिल दवंडे, युवराज कराळे, अनिल वानखडे, कॉ.अरविंद वानखडे, मनोहर बोराडे, रवींद्रसिंग गहलोत, भारत डहाके, उमेश नेरकर, प्रा.गंगाधर दवंडे सह उपस्थित होते.