ग्लोबल कहार चॅरिटेबल ट्रस्टची मागणी
परभणी/गंगाखेड (Sexual assault case) : बदलापूर व माजलगाव येथील लैंगिक अत्याचाराच्या घटना अजूनही ताज्या असताना त्याच घटनां प्रमाणे जिल्ह्यातील सोनपेठ येथे एका नराधमाने अंगणवाडीत शिकणाऱ्या कोवळ्या बालिकेला आपले भक्ष बनवून तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी (Sexual assault case) गुन्हा दाखल झाला असून फरार नराधमास तात्काळ अटक करण्याची मागणी गंगाखेड येथील तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात ग्लोबल कहार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.
परभणीतील सोनपेठ येथील एका इंग्लिश स्कूलमध्ये दि. ५ ऑक्टोबर रोजी बालवाडीत शिकणाऱ्या चिमुरडीवर विकृत मनोवृत्तीच्या नराधमाने स्वच्छ्ता गृहात लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या (Sexual assault case) गुन्ह्यातील नराधम आरोपी आज पर्यंत पोलीसांना मिळून आला नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात असून या घटनेमुळे पालक वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व मुलींना शिकवावे की नाही असा प्रश्न ही त्यांना पडला आहे. लहान बालकांवर दिवसेंदिवस होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे पुरोगामी महाराष्ट्रात कायद्याचा धाक आहे का असा प्रश्न ही सुज्ञ नागरिक विचारत आहे.
बालवाडीत शिकणाऱ्या चिमुरडीला साधा स्पर्श काय असतो हे कळत नाही अशा (Sexual assault case) बालिकेवर या नराधमाने अत्याचार केल्याने ही घटनाच किळसवाणी असल्याचे सांगत या घटनेतील आरोपी पोलीसांना सापडत नाहीत ही सुद्धा चिड आणणारी गोष्ट असल्याचे बोलल्या जात आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात चिमुकल्या बालिकेवर अत्याचार करून फरार झालेल्या नराधम आरोपीचा शोध पोलीसांनी तात्काळ घेत त्याला जेरबंद करावे व हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा मिळेल अशी कायदेशीर कारवाई करावी अन्यथा कहार, भोई, भिल्ला व मच्छीमार समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तहसीलदार उषाकिरण श्रंगारे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर संगीता कचरे, सोमेश्वर गहिरे, भारत कचरे, छत्रपती गहिरे, रोहिदास गहिरे, बालासाहेब पठाडे, महादेव लिंबोरे, पवन कचरे, विठ्ठल भुंगासे, गिरीजा कचरे, विष्णुदास लकारे, सुरेखा लकारे, माधुरी लकारे, शालू लकारे, सारजा परसे, विठ्ठल भूंगासे, माऊली परसे, नवनाथ गहिरे, एकनाथ परसे, यशोदा गहिरे आदींसह बहुसंख्य महिला व पुरुषांच्या स्वाक्षऱ्या आहेत.