हिमायतनगर (Nanded):- हिमायतनगर तालुक्यातील पारवा (खु) येथील शेतकरी योगेश पांडुरंग जाधव, शिवाजी कोंडबा जाधव यांच्या शेतातील सौर उर्जा दिनांक २१ में रोजी सायंकाळी वादळी वाऱ्याने तुटून पडल्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (damage) झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दिनांक २१ में रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले असुन यात अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पारवा.खु.येथील शेतकरी योगेश पांडुरंग जाधव शेत गट क्रं ०८ व शिवाजी कोंडबा जाधव यांच्या शेतात मागील काही दिवसांपुर्वी कुसुम सवलत शासकीय योजना (Govt Scheme)अंतर्गत पाच एच पी चा सौर उर्जा बसवण्यात आला होता. परंतु काही दिवसांतच या शेतकऱ्याच्या शेतातील सौर उर्जा (Solar energy) तुटून वादळी वाऱ्यात उडाल्यामुळे या दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची घटना दिं २१ में रोजी घडली आहे तरी संबंधित अधिकारी यांनी तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उन्हाळी पिकांसह अनेकांचे झोपड्या घरावरील पत्र उडाले तर काही भागात वीज पडून अनेक जनावरे दगावली आहेत असे अनेक जणांचे अनेक प्रकारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने याकडे ही लक्ष देवून पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यासह जनतेतून होत आहे.