– पवन जगडमवार
नांदेड (NEET exam) : नीट परीक्षेत (NEET exam) मोठा घोटाळा झाल्याचे सांगितले जातंय. विद्यार्थ्यांकडून सातत्याने या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केले जात आहेत. हेच नाही तर घेतलेली परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घ्यावी अशीही मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.या विरोधात देशभरात विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतयं.नीट परीक्षेच्या निकालात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. यामुळे दिवस-रात्र मेहनत करणार्या गोरगरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य शासनाच्या चुकीमुळे उध्वस्त झाल्याचा आरोप करीत , नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी,या परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी मार्फत चौकशी करून दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करावी,यासह अन्य मागणीसाठी युवक कॉंग्रेस, पीटीए, सीसीटीएफ आदी संघटनेच्यावतीने १४ जून रोजी शुक्रवारी सकाळी १० वाजता नांदेडमध्ये महाएल्गार मोर्चा काढण्यात आला.यामोर्चात (NEET exam) नीटची तयारी करणारे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. शहरातील भाग्यनगर येथून आयटीआय चौकापर्यंत रॅली काढून हा मोर्चा काढण्यात आला,यावेळी विद्यार्थ्यांनी एनटीए व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला आहे.
नीट परीक्षेत मोठा घोटाळा?
NEET परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. हेच नाही तर अनेकांना या परीक्षेत अधिकचे मार्क पडल्याचे देखील दिसत आहे. नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत हजारोच्या संख्येने विद्यार्थी नांदेडमध्ये रस्त्यावर उतरल्याचे देखील बघायला मिळतंय. देशभरातून विद्यार्थ्यांमध्ये (NEET exam) नीट परिक्षेच्या निकालावरून रोष बघायला मिळतोय.त्याचे पडसाद नांदेडमध्ये देखील उमटत आहेत.शुक्रवारी विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत. (NEET exam) नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत, हातात वेगवेगळ्या प्रकारचे फलक घेत निषेध व्यक्त केलाय, शुक्रवारी विद्यार्थ्यांनी शहरातील भाग्यनगर परिसरातून महात्मा फुले पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्या मार्फत शासनाकडे निवेदन पाठवून (NEET exam) नीटची परिक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे.
नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर
भारतात बऱ्याच ठिकाणी नीट 2024 चा पेपर लीक झाल्याच्या आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. झालेली (NEET exam) नीट परीक्षा रद्द करून पुन्हा नीट परीक्षा घ्यावी,अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून जोर धरत आहे.या आंदोलनात भारतीय युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे, PTA चे माजी प्रदेशाध्यक्ष आर.बी.जाधव , PTA चे जिल्हाध्यक्ष राज आटकोरे , CCTF चे जिल्हाध्यक्ष नागेश कल्याणकर , काँग्रेस पक्षाचे केदार पा. साळुंखे, विश्वास कदम, महेश देशमुख, निरंजन पावडे, संदीप गौड, दिगांबर पा. तिडके, केतन देशमुख, प्रशांत पाटील मुंगल, शिवम मगरे, भास्कर कळणे, ज्ञानेश्वर मगरे, शरद पवार, महेश पवार, तिरुपती मगरे, युवा सेनेचे संभाजी गाडे, बापूजी गाडे तसेच हजारो विद्यार्थी, पालक आणि विविध चळवळीतील प्रतिनिधी उपस्थित होते.