Budget:- केंद्रीय अर्थमंत्री(Economy Minister) निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. NEET पेपर लीक प्रकरणी सुप्रीम कोर्टात(supreme court) आजही सुनावणी होणार आहे. परीक्षेतील एका प्रश्नाच्या अचूक उत्तरावर मत तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक
दिल्लीत महाराष्ट्र काँग्रेसच्या (Congress)नेत्यांची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole), बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) उपस्थित राहणार आहेत. त्यात केसी वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित राहणार आहेत. ज्ञानवापी संकुलातील व्यासजींच्या तळघरात असलेल्या देवतांची सेवा आणि पूजा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या(high court) निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. ब्रिटनमध्ये 14 वर्षांनंतर लेबर पार्टीने सरकार स्थापन केल्यानंतर परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी आज भारतात येत आहेत.