रस्त्यावरील विद्युत खांब उठले नागरिकांच्या जिवावर
भंडारा (Bike Accident) : शहरातील अनेक रस्ते, जिल्हा मार्ग रुंद झाले खरे मात्र रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबामुळे त्यांच्या रुंदीकरणाचा काहीही उपयोग होत नाही. उलट वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत आहे. (Bike Accident) रस्त्यावरील विद्युत खांबामुळे रोजच लहान मोठे अपघात घडत आहेत. हे विद्युत खांब काढण्याची जबाबदारी कोणाची? याचा वाद सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.
राजीव गांधी चौक ते नागपूर नाकापर्यंत तकिया मार्गावर एका विद्युत खांबाला मोटारसायकल आदळल्याने झालेल्या (Bike Accident )अपघातात मोटारसायकलस्वार तरुण गंभीर जखमी झाला. त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील राजीव गांधी चौक ते नागपूर नाकापर्यंत सुरू असलेल्या प्रमुख जिल्हा मार्गाच्या मधोमध अनेक विद्युत खांब उभे आहेत. विद्युत खांब उभे असताना रस्त्याच्या एका बाजुचे सिमेंटीकरणाचे काम काही प्रमाणात करण्यात आले आहे. (Bike Accident) रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब वाहनधारकांच्या जिवाशी खेळत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण मात्र एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. सदर रस्त्याचे काम आजघडीला रखडले आहे. त्या कामाचा बट्ट्याबोळ सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका आणि महावितरण या तीन विभागातील अधिकार्यांनी केला आहे.
दरम्यान याच मार्गावरून जात असताना गोरू पटेल नामक तरुणाची मोटारसायकल विद्युत खांबावर धडकल्याने झालेल्या अपघातात तो जखमी झाला. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरला दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी सुध्दा अशा घटना घडलेल्या आहेत. (Bike Accident) रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब दोन विभागाच्या वादात नागरिकांच्या जिवावर उठल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात असून लोकांचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरून वीज वितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने त्या रस्त्याचे बांधकाम अद्यापही रखडलेलेच आहे.