यवतमाळ (Bike Accident) : दुचाकी व मालवाहू पिकअप वाहनाची समोरासमोर जबर धडक झाल्यामुळे मोठा अपघात घडला.या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसर्याची प्रकृती चिंताजनक आहे.अपघाताची हि घटना यवतमाळ शहर ठाण्याच्या हद्दीतील करळगाव घाटात दुपारच्या सुमारास घडली.
मनीष मारोतराव इडपाते (२६) रा.सरूळ असे मृतकाचे नाव आहे तर संजोग गोवर्धन वासनिक (१६) रा.सरूळ ता बाभुळगाव असे जखमीचे नाव आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास एमएच २७ बीएक्स २०२७ पिकअप मालवाहू वाहन बाभुळगाव ते यवतमाळच्या दिशेने येत होते तर एमएच २९ बीके १७५७ क्रमांकाचे दुचाकी वाहन यवतमाळवरून बाभुळगावच्या दिशेने जात होते. (Bike Accident) यवतमाळ शहर ठाण्याच्या हद्दीतील करळगाव घाटातून जात असताना दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका गंभीर होता कि यामध्ये मनीषचा मृत्यू झाला तर संजोग गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी जखमीला तात्काळ उपचारासाठी दाखल केले.हद्द यवतमाळ शहर ठाण्याची असलयाने पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली आहे. या (Bike Accident) प्रकरणाचा पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस करत आहे.