परभणी/दैठणा(Parbhani) :- रस्त्यावर बंदावस्थेत थाबलेल्या ट्रॅक्टर(tractor) ट्रॉलीला पाठी मागुन धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा(bike rider) मृत्यू झाला. ही घटना इंदेवाडी फाट्याजवळ १२ जून रोजी सायंकाच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी दैठणा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
इंदेवाडी फाट्याजवळील घटना परभणीच्या दैठणा पोलिसात नोंद
ज्ञानेश्वर मुरलीधर सोळंखे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीचे वडिल मुरलीधर तुळशीराम सोळंखे वय ५५ वर्ष यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. १२ जून रोजी सायंकाळच्या सुमारास मुरलीधर सोळंखे हे एम.एच. २२ ए.बी. १३३९ या क्रमांकाच्या दुचाकीने घराबाहेर पडले होते. इंदेवाडी फाट्याजवळ रस्त्यावर बंदावस्थेत उभा टाकलेला ट्रॅक्टर एम.एच. २२ ए.एम. १९०५ या वाहनाला मुरलीधर सोळंखे यांची दुचाकी पाठीमागुन धडकली(hit). हा अपघात कोठंबवाडी येथे येत असताना झाला. अपघातात गंभीर जखमी(seriously injured) होऊन मुरलीधर सोळंखे यांचा मृत्यू झाला. घटनास्थळला दैठणा पोलीस ठाण्याचे सपोनि. बी.आर. बंदखडके, पोउपनि. सुर्यवंशी यांनी भेट दिली.
युवकाची गळफास लावून आत्महत्या
परभणी शहरातील मोची गल्ली भागात राहणार्या एका १७ वर्षीय तरुणाने घरातील पत्राखालील आडुला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या(Suicide) केली. ही घटना गुरुवार १३ जून रोजी सकाळी उघडकीस आली. अजय जितेंद्र शिरसे वय १७ वर्ष, असे मयत युवकाचे नाव आहे. आत्महत्ये मागचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळाला पोहेकॉ. केजगीर, मोहाळे यांनी भेट दिली. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. नानलपेठ पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोहेकॉ. केजगीर तपास करत आहेत.