लिंबी फाट्या जवळील घटना
पुसद (Pusad Accident) : मालवाहू कंटेनरला मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 30 डिसेंबर रोजी घडली आहे. वसंत नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुसद – वाशीम रोड वरील लिंबी फाटा येथे दि. 30 डिसेंबर रोजीच्या रात्री अंदाजे पावणे 10 वाजताचे दरम्यान पुसद वरून वाशीम मार्गे जात असलेल्या कंटेनर क्र. NL 01 AG 3188 चालक मोहम्मद सरफराज अब्रार अहेमद वय 32 वर्ष रा. कतरा दयाराम , प्रयागराज , उत्तरप्रदेश याने त्याचे ताब्यातील कंटेनर भरधाव वेगाने चालवत असताना कोणत्याही प्रकारचे इंडिगेटर न दाखवता डावीकडे वळवून अचानक ब्रेक लावून रस्त्यावर उभा केल्याने , मागून पुसद वरून लिंबी कडे येत असलेल्या हिरो passion pro दुचाकी क्र. MH 29 AY 7514 चालक प्रल्हाद गनपत मस्के वय 30 वर्ष रा. लिंबी हि दुचाकी कंटेनर ला मागच्या बाजूला ड्राइव्हर साईडला धडकली.
यामध्ये दुचाकी वरील चालक प्रल्हाद गणपत मस्के वय 30 वर्ष रा. लिंबी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेत दुचाकीस्वाराचा पाय गुडघ्यातून मोडला गेला. या (Pusad Accident) घटनेची माहिती नातेवाईकांना तसेच गावकऱ्यांना कळताच त्यांनी तात्काळ प्रल्हाद यास ऑटो मध्ये टाकून शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे आणले. परंतु तेथे डॉक्टरांनी तपासाअंती प्रल्हाद यास मृत घोषित केले. अशा प्रकारची फिर्याद मृतक चा भाऊ पवन गनपत मस्के वय 18 वर्ष याने वसंत नगर पोलीस स्टेशन येथे दिली.
या तक्रारी अन्वये कंटेनर क्र. NL 01 AG 3188 चालक मोहम्मद सरफराज अब्रार अहेमद वय 32 वर्ष रा. कतरा दयाराम , प्रयागराज , उत्तरप्रदेश याचे विरुद्ध अपराध क्र. 608/2024 कलम 281 , 106/1 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा प्राथमिक तपास वसंत नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम आडे हे करत असून , (Pusad Accident) घटनेचा तपास पोलीस हवालदार विजयसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.