मेहकर (Birsa Munda) : लोणार तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला असून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचे आपले ध्येय आहे. टिटवी येथे आदिवासींचे दैवत असलेल्या (Birsa Munda) बिरसा मुंडा यांचे नावाने भव्य आदिवासी भवन उभारले जाईल, अशी घोषणा आमदार संजय रायमुलकर यांनी दिनांक दहा ऑगस्ट रोजी भव्य रॅली दरम्यान केली.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त लोणार तालुक्यातील गोत्रा, नांद्रा,टिटवी, रायगाव आदी गावांमधील शेकडो आदिवासी तरुणांचा सहभाग असलेल्या मोटार सायकल रॅलीचे आगमन नांद्रा गावात झाल्यानंतर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमात उपस्थित नागरिकांसमोर बोलतांना आमदार रायमुलकर यांनी वरील घोषणा केली. आदिवासी नेते भगवानराव कोकाटे, शिवसेनेचे शिव पाटील तेजनकर, डॉक्टर घुगे, सरपंच उत्तमराव सानप आदींसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
टिटवी येथे ग्रामपंचायतने जागा उपलब्ध करून द्यावी, तेथे आदिवासींचे दैवत असलेल्या बिरसा मुंडा (Birsa Munda) यांचे स्मारक आणि भव्य आदिवासी भवनाची निर्मिती करण्याचा शब्द तुम्हाला देतो, असे सांगून रायमुलकर पुढे म्हणाले की, मतदार संघातील जनतेचे अपार प्रेम आपल्यावर असून त्यांच्या ऋणातून कधीही मुक्त होता येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा कार्यक्षम व धडाडीचा मुख्यमंत्री राज्याला मिळाल्याने विकास कामांचा धडाका सुरू असून लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण प्रगतीचे ध्येय गाठले जात आहे.
आदिवासी मुलांच्या सोयीसाठी घाटबोरी येथे साडेबारा कोटींची आश्रम शाळा, टिटवी येथे आश्रम शाळा होत आहेत व कालच दोन्ही तालुक्यातील आदिवासी तेरा गावांमधील सिमेंट रस्ते बांधकामासाठी तीन कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे, अशी माहिती आमदार रायमुलकर यांनी दिली. आदिवासी गावांमधील (Birsa Munda) बिरसा मुंडा यांच्या मंदिरांमध्ये बिरसा मुंडा यांचे संगमरवरी पुतळे आपण स्वतः देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरीनाथ कोकाटे यांनी केले. आदिवासी गावांमधील शेकडो तरुणांची मोटर सायकल रॅली या कार्यक्रमानंतर लोणार कडे रवाना