हिंगोलीत वकील संघाची मागणी
हिंगोली (Tehsil Office) : तहसील कार्यालयांतर्गत येणारी जन्म- मृत्यूची प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी (Lawyers Association) वकील संघाच्या वतीने बुधवारी उपविभागीय अधिकारी यांचेकडे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केले की, जन्म मृत्यूची प्रकरणे चालविण्याचा अधिकार तहसिलदार यांना आहे, मात्र सदर प्रकरणात दाखल झाल्यानंतर त्याच दिवसी जाहीर प्रकटन अर्जदारास मिळत नाही, परंतू पाच तेसहा महिन्यानंतर मिळत असल्याने विलंब होत आहे. त्यामूळे तातडीने ही प्रकरणे वेळेत मार्गी काढल्यास पक्षकारांना सोयीचे होईल. अन्य था नायब तहसिलदार यांनी जे प्रकरण चालवीत आहेत त्यामूळे वकील मंडळींना पक्ष कारांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करावा अशी मागणी वकील संघाच्या वतीने बुधवारी करण्यात आली आहे. यावेळी (Lawyers Association) वकील संघाचे अध्यक्ष ऍड.शिवशंकर वाबळे, ऍड.सतीश देशमुख, ऍड.गणेश ढाले, ऍड.अशोक सावंत, ऍड.रवींद्र सोनी, ऍड.एम. आर. नीळकंठे, ऍड.पी.के.पुरी, ऍड.मनिष साकळे, ऍड.एस.के.सिरसाठ आदिंची उपस्थिती होती.