विकासात्मक व समाजोपयोगी कार्यांनी धर्मवीर आमदार संजूभाऊंचा वाढदिवस !
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : शहरासह मतदारसंघाचे विकासपुरुष समजले जाणारे संघर्षयोद्धा धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad), यांचा वाढदिवस नेहमीच ठरतो विकासात्मक व सामाजिक कार्याचा जल्लोष. आज गुरुवार २९ मे रोजी त्यांनी ग्रामदैवत जगदंबा मातेचे महाआरती करून, ४३ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन केले.. त्यानंतर दिवसभर चाललेल्या रक्तदान शिबिरात ५००च्या वर कार्यकर्त्यांनी रक्तदान करून एक विक्रम नोंदविला. विशेष म्हणजे यात गायकवाड परिवारातील सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. त्यासोबतच विविध पुस्तके व शालोपयोगी साहित्यांनी त्यांची तुला करण्यात आली. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची भोजनाचीही व्यवस्था कार्यक्रमस्थळी होती. गीत-संगीताच्या श्रवणीय मैफिलीने वातावरण सुश्राव्य झाले होते. अशाप्रकारे विकासात्मक व समाजोपयोगी कार्यांनी साजरा झाला, धर्मवीर आमदार संजूभाऊंचा वाढदिवस !
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांचा वाढदिवस ४३ कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन सह जगदंबा मातेच्या मंदिरात महाआरती व महाराष्ट्र राज्य साजरा करण्यात आला सदर वाढदिवस यावेळी विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. सदर भूमिपूजन दरम्यान शहरातील अष्टविनायक नगर नामफलकापासून ते नगर परिषद हद्दीच्या पूर्व बाजूला जाणाऱ्या रस्ता सिमेंट काँक्रीकरणासह दोन्ही बाजूने नाली व पेव्हर ब्लॉग चे काम यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, ५ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
यासह प्रभाग क्रमांक १३ येथील बापू पठ्ठे यांच्या घरापासून ते नगर परिषद हद्दीपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता दोन्ही बाजूला नाली व फेवर ब्लॉक या कामासाठी चार कोटी ४५ लाख रुपये तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बुलढाणा शहरातील संगम तलावाच्या पुनर्जीवनीकरण करणे, यासाठी १३ कोटी राज्यस्तर महानगृहस्थान योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती ते धाड रोड जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणासाठी व दोन्ही बाजूने नाली व फेवर ब्लॉक या कामासाठी सहा कोटी सदतीस लाख रुपयेचा निधी मंजूर केला. सदर कामाचे व इतर विविध विकास कामाचे भूमिपूजन सकाळी ९ वाजेच्या दरम्यान करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान बुलढाणा शहरातील जगदंबा देवी मंदिरात आ. संजय गायकवाड यांच्या दीर्घायुष्यासाठी महाअभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी साडे१० वाजता महारक्तदान शिबिर घेण्यात आले, सदर शिबिर मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे पार पडले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, युवासेना जिल्हाप्रमुख मृत्युंजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, श्रीकृष्ण शिंदे, श्रीकांत गायकवाड, मोहन पऱ्हाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
५०० कार्यकर्त्यांनी केले रक्तदान..
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मातोश्री संपर्क कार्यालय येथे महारक्तदान शिबिर घेऊन वाढदिवस उत्साहात साजरा केला जातो. यंदाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल ५०० कार्यकर्त्यांनी सोयीचे समोर येऊन रक्तदान करत आपल्या नेत्याचा वाढदिवस (MLA Sanjay Gaikwad) सामाजिक जबाबदारी स्वीकारत पार पाडली.