नागपूर (Nagpur):- राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काटोल मतदार संघाचा गड जिंकण्याकरिता भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. सभांसह बैठकांचा जोर सुरू आहे. त्यामुळे या क्षेत्राचा भाजप उमेदवार कोण असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजप (BJP)नेते डॉ. परिणय फुके यांनी नुकताच काटोल क्षेत्राचा केलेल्या दौऱ्याने राजकीय हवा बदलली आहे. भाजप नेते डॉ. फुके यांच्या दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. इतकेच नव्हे तर राजकीय वर्तुळात डॉ. फुके यांच्या दौरामुळे साकोलीसह काटोलमध्येही त्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. भाजप नेते काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर व नागपूर मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्याही नावाची भाजप वर्तुळात चर्चा आहे. या दोन्ही नेत्यांनी काटोल विधानसभा मतदार संघ राजकीय वारसाच नव्हे तर जन्मापासून जुळली नाळ भाजप नेते डॉ. परिणय फुकेबाबत हायकमांडच निर्णय घेईल.
३३ बैठकांमुळे बदलले राजकीय समीकरण
मात्र काटोलशी त्यांची नाळ जन्मापासून जुळली आहे. त्यांचे आजोबा केशवरावजी डेहनकर हे १९६१ पासून राजकारणात आहेत. काटोल कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समितीचे ते सलग ४० वर्ष सभापती होते, या भागातील शेतकरी त्यांना सहकार महर्षी म्हणून ओळखतात. त्यांचे मामासुद्धा अपक्ष नगरसेवक होते, दोन वर्षांपासून त्यांची मामी नगरसेविका आहे. यावरून काटोल क्षेत्रात त्यांची बाजू भक्कम आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे आमदार व राज्याचे राज्यमंत्री पदही त्यांनी भूषविले आहे. दुसरीकडे भाजप नेते चरणसिंग ठाकूर यांनी आपल्या व्यक्तित्वाच्या बळावर काटोलच्या राजकारणात ठसा उमटवला असला तरी ओबीसी विशेषतः कुणबी कार्डमुळे त्यांचे गणित बिघडू शकते, अशी चर्चा आहे. अक्षरशः पिंजून काढला आहे. जनसंपर्कासह मोठ्याप्रमाणात समर्थकांची फळीसुद्धा त्यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे. असे असले तरी भाजपमध्ये उमेदवारी कुणाला मिळणार, पारडे कुणाचे जड आहे, हे येत्या काळात समोर येईल. त्यात भाजप नेते डॉ. परिणय फुके यांचा चार-पाच दिवसांपूर्वीचा नरखेड तालुक्यातील दौरा सर्वाधिक चर्चेचा ठरला. त्यांच्या समर्थनात काटोलातील सतरंजी संघटनासुद्धा मैदानात उतरली आहे. सतरंजी संघटनेने त्यांच्या स्वागताचे लावलेल्या बॅनर, पोस्टर व होर्डिंगमुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Nationalist Congress Party) काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही त्यांचे स्वागत केल्याने राजकीय चर्चेला बळ प्राप्त झाले आहे. त्यात डॉ. फुके हे भाजपचे मोठे ओबीसी (OBC) नेते आहे.
पक्षाने फुके कार्ड चालविल्यास चित्र वेगळे राहू शकते. कुठल्याही परिस्थितीत भाजपला काटोलचा गड सर करायचा आहे, यापूर्वी काटोलमधून भाजप नेते आशीष देशमुख जिंकून आले होते, हे विशेष. अशा परिस्थितीत भाजप नेते चरणसिंग ठाकूर यांना तिकिटासाठी शक्ती पणाला लावावी लागणार आहे. पक्ष जो आदेश देईल, तो मान्य राहील, यावर ते ठाम असल्याचे म्हटले जाते. हीच बाबत्यांच्यासाठी जमेची आहे. नुकतेच महाराष्ट्र विधानसभा समीक्षक भाजप नेते विजयवर्गीय यांनी साधलेल्या संवादाने काटोल क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला आहे. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी केंद्रीय मंत्री(Union Minister) सुबोध मोहिते यांच्या नावाची काटोलमध्ये चर्चा आहे.