Hingoli:- लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार श्री राहुलजी गांधी(Rahul Gandhi) यांना जीवन मारण्याची धमकी देणारा भाजपचा नेत्यावर हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे कारवाई करण्याची मागणी.
हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे कारवाई करण्याची मागणी
दिल्ली येथील भाजप नेता माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याने लोकसभेतील विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री राहुलजी गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे ही बाब अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह आहे. परंतु अद्याप पर्यंत सरकारने आरोपीविरुद्ध कोणती कारवाई केली नाही व यावरून भारतीय जनता पक्षाचे विकृत मानसिकतेचे दर्शन होते या देशासाठी गांधी कुटुंबीयांचा तो त्यागाणी बलिदानाचा इतिहास आहे. या आरोपीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी अशी हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मागणी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपती भवनाला निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपती भवनाला निवेदन
यावेळी ॲड.सचिन नाईक (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा प्रभारी) दिलीपराव देसाई (जिल्हाध्यक्ष) सुधीर आप्पा सराफ,प्रकाश थोरात,बापूराव बांगर, अनिल नेनवानी,सुरेश आप्पा सराफ,भागवत चव्हाण, जुबेर मामू, मुजीब कुरेशी, माबुद बागवान,राजाराम खराटे, सुदाम खंदारे,अशोक चव्हाण,अब्दुल मतीन बागवान,भास्करराव पोले, बासित मौलाना,पंडित खराटे,अख्तर खा जब्बार खा,चंद्रकांत हांडे गोरखनाथ पानपट्टे ,महेश थोरात, ओम तुरे,शुभम बियानी, नजीर, शेख शफीक, राम दुर्गे, सचिन शिंदे, आकाश माकुरवर, यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.