लातूर(Latur) :- आम्ही भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde)यांच्यासोबत भाजपमध्ये कार्य केले. मात्र आता गोपीनाथरावांची भाजप (BJP)राहिली नाही, भाजपमध्ये जुने लोकही राहिलेले नाहीत. त्यामुळे हळूहळू आणखी लोक बाहेर पडतील, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते पनगेश्वर शुगर कारखान्याचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाने यांंच्यासह अनेक जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
लहाने यांंच्यासह अनेक नेते काँग्रेसमध्ये
पन्नगेश्वर साखर कारखान्याचे संचालक सुरेश लहाने, सभापती दिलीप गोटके, सुग्रीव मुंढे, नगरसेवक गजेंद्र चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व वंजारी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिलीपराव देशमुख यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करीत पक्षात स्वागत केले. दरम्यान हा प्रवेश भाजपाचे आमदार रमेशआप्पा कराड यांना धक्का मानला जात आहे. लातूर जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. मागील काळात लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री मंत्री अमित देशमुख आपले आमदार धीरज देशमुख यांनी या भागात अतिशय चांगले काम केले आहे. भविष्यात चांगले काम करतील. रेणापूर तालुक्यांतील विकासाची कामे काँग्रेस (congress) पक्ष करू शकतो. देशमुख परिवार यांच्या नेतृत्वाखाली या भागाचा भविष्यात विकास होऊ शकतो. यासाठी आम्ही सर्वांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असेही ते म्हणाले.
यावेळी राज्य साखर महासंघाचे सदस्य आबासाहेब पाटील जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जिल्हा कोंग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, रेणापूर बाजार समितीचे माजी सभापती चंद्रचुड चव्हाण, जनार्दन वंगवाड, ॲड. बाबासाहेब गायकवाड, अभिजित चव्हाण आदी उपस्थित होते.
यांंचा झाला प्रवेश…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या(Assembly Elections) पार्श्वभूमीवर रेणापूर तालुक्यातील भाजपचे नेते तथा पन्नगेश्वर साखर कारखान्याचे संचालक व लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश लहाने यांच्यासह रेणापूर पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप गोटके, वंजारी सेवा संघाचे महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख सुग्रीव मुंडे, रेणापूर नगर पंचायतीचे भाजपचे नगरसेवक गटनेते गजेंद्र चव्हाण, माजी सरपंच गोविन्द नागरगोजे, सुरेश केंद्रे, वंजारवाडीचे पोलीस पाटील सीताराम केदार, रमेश केंद्रे, वैजनाथ लहाने, जीवा पैलवान यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या उपस्तित्तीत आशियाना निवासस्थानी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.