मतदार राजाही संभ्रमात
मानोरा/कारंजा (Karanja-Manora Assembly Constituency) : मानोरा विधानसभा क्षेत्रात होणाऱ्या विधानसभेच्या उमेदवारीवरून भाजपा पक्षात चालू असलेल्या गोंधळामुळे अंतिम क्षणी उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत मतदार संघातील प्रत्येक गावामध्ये मतदार राजांची चावडीवरील चर्चेला उधाण आले आहे. नुकतेच पक्ष निरीक्षक प्रतापसिंह करोसिया हे मतदार संघातील दोन्ही तालुक्यात बैठकीसाठी आले तेंव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आधी ऍड ज्ञायक पाटणी यांची उमेदवारी जाहीर करा, त्यानंतरच बैठक घ्या, आम्ही मतदार संघातील कार्यकर्ते लोकनायक स्व आमदार राजेंद्र पाटणी यांचे कार्यकर्ते आहोत, असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे बैठकीत गोंधळ उडाला.
कारंजा – मानोरा मतदार संघात उमेदवारीवरून भाजपामध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. सन २०१४ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार युसुफ पुंजानी यांचा व २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार स्व. माजी आमदार प्रकाश डहाके यांचा पराभव करून निवडून आले होते. यावेळी आमदार स्व राजेंद्र पाटणी यांचे चिरंजीव ऍड ज्ञायक पाटणी यांनी भाजपाकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजपाचे प्रदेश पदाधिकारी राजु राजे पाटील, महंत जितेंद्र महाराज, भक्तराज राठोड महाराज व माजी राज्यमंत्री रणजीत पाटील यांनीही पक्ष श्रेष्ठीकडे उमेदवारीचा दावा केलेला आहे. यामुळे आता भाजपमधील उमेदवारी स्पर्धा चव्हाट्यावर आली आहे. पक्ष निरीक्षक प्रतापसिंह करोसिया मतदार संघातील दोन्ही तालुक्यात बैठकीसाठी व उमेदवार चाचपणी साठी आले असता भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ प्रमुखांनी ऍड ज्ञायक पाटणी यांची उमेदवारी आधी जाहीर करा.
त्यानंतरच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्याचे दिवस जस जसे जवळ येऊ लागले तशी तशी उमेदवारीसाठी सुरू असलेली ओढाताणची चर्चा संपूर्ण मतदार संघात ऐकावयास येत आहे. भाजपाचे पक्ष निरीक्षक करोसिया हे मतदार संघातील दोन्ही तालुक्यात बैठकीसाठी आले असता इच्छूक उमेदवाराच्या भाजपाचे पदाधिकारी, बूथ प्रमूख व कार्यकर्त्यांनी आधी उमेदवारी जाहीर करा, त्यानंतरच बैठक घ्या, अशी आक्रमक भूमिका घेत आम्ही मतदार संघातील सर्वत्र लोकनायक स्व. राजेंद्र पाटणी यांचे चिरंजीव युवा नेते ऍड ज्ञायक पाटणी यांच्या सोबत असल्याची पक्ष निरीक्षकाना बतावणी केली. ॲड पाटणी इतर सर्वच उमेदवार कारंजा – मानोरा मतदार संघाच्या उमेदवारी करीता आग्रही असुन माघार घेण्यास कोणीही तयार नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तेंव्हा आता भाजपाचा हा गोंधळ कोणत्या स्तरावर थांबणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.