परभणी/जिंतूर (Jayant Patil) : लोकसभेत भारतीय जनता पक्षाने अबकी बार चारशे पारची घोषणा केली होती कारण त्यांचे खासदार चारशे पेक्षा जास्त निवडून आले तर त्यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली देशाची घटना बदलायची होती परंतु देशातील जनतेने त्यांच्या आपेक्षावर पाणी फेरले. लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपा नेत्यांचे पाय जमिनीवर आले असून आता राज्यातील बहिणी व भावासाठी वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना आपल्याकडे आकर्षण करण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. ते शहरातील जिल्हा परिषद मैदानावर शिवस्वराज्य यात्रेनिमित्त अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खा. अमोल कोल्हे,खा. फौजीया खान, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर,माजी आमदार विजय भांबळे,शेख मेहबूब, विजय गव्हाणे,प्रेक्षा भांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की भाजपाचा 1971 पासून देशाच्या घटनेला विरोध आहे राज्यातही त्यांनी वाममार्गाने सत्ता काबीज केली आणि त्यांच्या शेजारी अजित पवार व एकनाथ शिंदे जाऊन बसले लोकसभेला सपाटून मार खाल्ल्यानंतर राज्यातील बहीण त्यांची लाडकी झाली हे लाडक्या बहिणीसाठी नाही तर लाडक्या खुर्चीसाठी चाललेले प्रयत्न आहेत देशातील व राज्यातील सत्ता चालवण्याकडे भाजपावाल्यांचे लक्ष नाही.
राज्यातील विकासाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या नागरिकांच्या विकासाचा पैसा त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन व इतर खात्याचे पैसे त्यांनी लाडक्या बहिणीच्या योजनांसाठी वळवली त्यामुळे राज्यातील विकास खुंटला असून राज्यात महिलान वरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे बालवाडी पासून ते पदव्युत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण महागले असून राज्य सरकार सरकारी शाळा बंद करून श्रीमंताची पोट भरत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस श्रीमंत व गरिबांमधील दरी वाढत असून मुठभर लोकच श्रीमंत होत आहे. राज्यातील योजनांच्या जाहिरातीसाठी राज्य सरकारने पगारी नोकर नेमलेले असून 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळ्याचा पंतप्रधानानी उल्लेख करतात राष्ट्रवादी मधील अनेक जण पक्ष सोडून गेले त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या विजय भांबळे यांच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन ही (Jayant Patil) त्यांनी केले
यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले की दिल्लीच्या तक्ता पुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही झुकणारही नाही राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपकी 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आल्याने पंतप्रधानाची सुद्धा भाषा बदलली असून समान नागरि कायद्याची भाषा बोलणारे सेक्युलर सिविल कोड ची भाषा बोलत आहे. हा बदल जनतेने घडवला आहे मताची आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी असे म्हणत त्यांनी लाडक्या बहिण योजनेबद्दल नागरिकांना माहिती देऊन सोयाबीन,कापूस,तुर,हरभरा यांच्या हमीभावाचा काय झालं असा प्रती प्रश्न ही विचारला बहिणींना ओवाळणी घातली पण सुशिक्षित तरुणांच्या हाताला काम नाही आज राज्यातील अडीच लाख पदे रिकामी असून या रिकाम्या पदांचा पगार शासन दरबारी जमा होत आहे.
याच पगारातून विधानसभा निवडणुकीची तयारी राज्य शासन करत आहे राज्यातील 17 प्रकल्प गुजरात कडे वळविण्यात आले त्यामुळे राज्यात बेकारी वाढली असून गुन्हेगारी मध्ये मोठी वाढ होत आहे. आज छोट्या शहरातली,ग्रामीण भागातील तरुण मुले मोठ्या शहरात मोलमजुरी करत असताना दिसून येत आहे. राज्यात सत्ता येत नसल्याचे लक्षात येताच निवडणुका पुढे ढकलल्या असून येणाऱ्या निवडणुकीत यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आव्हान खासदार अमोल कोल्हे यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती बाबत खोटे गुन्हे दाखल केले : माजी आ विजय भांबळे
यावेळी बोलताना माजी आमदार विजय भांबळे म्हणाली की, विद्यमान आमदारांनी राज्यातील गृहमंत्री यांचा दबाव आणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन मुख्य प्रशासक व अशासकीय प्रशासक मंडळाविरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केले बारा एक ची परवानगी घेऊन व्यापाऱ्यांना व्यापारी संकुल उपलब्ध करून दिले असताना ते बेकायदेशीर कसे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला शहरातील सगळे व्यापारी दहशतीखाली असून विधानसभा निवडणुक झाल्यानंतर सगळ्या गोष्टींचा हिशोब घेतल्या जाईल जे गद्दार झाले त्या गद्दारांना विधानसभा झाल्यानंतर त्याची जागा दाखवून देऊ.लोकसभेत नागरिकांनी भाजपाला त्यांची जागा दाखवल्यानेच बहीण लाडकी झाल्याचेही ते म्हणाले कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 30 वर्षांपूर्वीचे गाठोडे बांधलेले असून ते सोडवण्यास भाग पाडू नका अशी गर्भित धमकी त्यांनी नाव न घेता लगावली.