नागपूर(Nagpur) :- पाचव्या दिवशीही महाविकास आघाडी कडून विधानसभा पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले.
म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”
महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘भक्त गुंडा पार्टी’ असे फलक घेऊन आंदोलन करत ‘तब लढे तो गोरोसे, अब लडेंगे भाजपके गुंडोसे’, ‘भाजप गुंडांचा पक्ष, फोडाफोडी हेच लक्ष्य’ अशा घोषणा यावेळी दिल्या. आंदोलनामध्ये नाना पटोले(Nana Patole), विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar), अंबादास दानवे, अनिल चौधरी, भाई जगताप, रोहित पवार(Rohit Pawar), अमीन पटेल, डॉ. प्रज्ञा सातव, विकास ठाकरे, नितीन राऊत आदींचा सहभाग होता.