शासनाच्या निषेधार्थ घोळवा पाटी येथे रास्ता रोको आंदोलन
कळमनुरी (Maratha Andolan) : मुंबई येथे आरक्षण मागणी साठी पोहचलेल्या मराठा समाज बांधवानची अडवणूक करण्यासाठी मुद्दाम राज्यशासनाने गैरसोय होईल आशा पद्धतीने सुविधा बंद केल्या याच्या निषेधार्थ तालुक्यातील समाज बांधवा कडून ३१ ऑगस्ट रोजी हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या घोळवा पाटीवर तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मुंबई येथे मराठा समाजाला आरक्षण (Maratha Andolan) देण्याच्या मागणी साठी लाखो मराठा बांधव मुंबई पोहचले असता त्यांना गैरसोय होईल या साठी राज्य शासनाने पाणी, शौचालयाची सोय होऊ नये यासह हॉटेल्स बंद करून जेवणासाठी मराठा समाजाला अडचण होईल यासाठी हॉटेल्स बंद ठेवण्याचा प्रयत्न केला. याचा तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त करीत शासनाच्या निषेधार्थ ३१ ऑगस्ट रोजी तालुक्यातील घोळवा पाटी वर राष्ट्रीय महामार्गांवर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
हिंगोली नांदेड रस्त्यावरील रास्ता रोको मुळे रस्त्यावर वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्याने वाहनधारकांची मोठी अडचण झाली होती. यानंतर (Maratha Andolan) आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.यावेळी पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
