पुसद (Blood donation) : आज यशवंत रंगमंदीर येथील बचत भवनात “आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर” आयोजीत करण्यात आले होते . सदर शिबिराचे आयोजन उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल व तहसीलदार महादेव जोरवर यांच्या मार्गदर्शनात उपस्थितीत सदर शिबीर संपन्न झाले. या सदर शिबीराकरीता तालुका आरोग्य अधिकारी व वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील चमु उपस्थित होती. डॉ. नयन गेडाम, समाजसेवा अधिक्षक, कबीर दरणे, अतुल राऊत, राजु गेडाम, सचिन सोनवाल ई. यांनी रक्तसंकलनाचे कार्य पार पाडले. या अनुषंगाने भारतीय डाक विभाग व स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा पुसद यांनी संयुक्तपणे (Blood donation) शिबीरातील उपस्थितांना विविध प्रकारच्या बँकींग सेवांबाबत माहिती दिली.
या (Blood donation) शिबीरामध्ये महसुल व ईतर विभागातील अधिकारी/कर्मचारी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन रक्तदान केले व रक्तदान करणा-या अधिकारी/कर्मचारी यांना रक्तदान केल्याबाबतचे प्रमाणपत्रे देण्यात आली. शिबीर यशस्वी करण्याकरिता नायब तहसीलदार व्ही.जी.इंगोले, निवासी नायब तहसीलदार गजानन कदम, दिलीप कोलेवाड, जयकुमार राठोड, डी. के. जाधव, आर.डी.जाधव , आर. इंगळे व मनोज कोरडे, तलाठी प्रशांत मुक्कावार व ईतर कर्मचारी उपस्थित होते.