मान्सुन पुर्व पावसाळ्यात बचावात्मक काम
हिंगोली जिल्हातील पाच तालुक्यातील अग्निशमन दल कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
औंढा नागनाथ (Aundha Irrigation lake) : हिंगोली जिल्ह्यात मान्सुनपुर्व तयारी करण्याकरीता जिल्हा प्रशासन युध्द पातळीवर काम करीत आहे. मान्सुम पुर्व पावसाळ्यात बचावात्मक काम करण्यासाठी औंढा नागनाथ येथील लघु पाटबंधारे (Aundha Irrigation lake) तलावात हिंगोली जिल्हातील पाच तालुक्यातील नगरपालिका व नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना बोट चालविण्याचे व शोध बचावाचे प्रशिक्षण दिले जात आहे.
बोट चालवण्याचे कौशल्य आणि पाण्यात आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण. या (Aundha Irrigation lake) प्रशिक्षणात बोट चालवणे, सुरक्षा उपकरणे वापरणे, पाण्याच्या धोकादायक परिस्थितीत काय करायचे, बचाव कार्य कसे करायचे, आणि आवश्यक प्रथमोपचार कसे करायचे याबद्दल माहिती दिली.बोट सुरक्षितपणे कसे चालवायचे, दिशा कसे ठरवायची,बोटचे इंजिन कसे चालवायचे, ब्रेक कसे वापरायचे, आणि बोटीचे संतुलन कसे ठेवायचे,बोटीच्या तांत्रिक समस्या आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे.लाईफ जॅकेट, फ्लोट, आणि इतर सुरक्षा उपकरणे कशी वापरायची.पाण्यात अडकलेल्या व्यक्तीला कसे वाचवायचे, आणि पाण्यात पडलेल्या व्यक्तीला कसे बाहेर काढायचे.पाण्यातील अपघातांमध्ये प्रथमोपचार कसे करायचे.आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कसे संपर्क कसा करायचा. वाहते पाणी आणि गोठलेले पाणी यामध्ये बोट कशी चालवायची.
यावेळी हिंगोली उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे , वसमत उपविभागीय अधिकारी विकास माने, हिंगोली मुख्याधिकारी अरविंद मुंडे, सेनगाव मुख्याधिकारी गणेश गांजरे, अग्निशमन अधिकारी आकाश तांडेल, पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांची उपस्थिती होती. यावेळी अग्निशामन दल कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांना बोट चालविणे व इतर साहित्य हाताळणे याची प्रशिक्षण सुनील आदोडे व अग्निशामन अधिकारी भागवत धायतडक यांनी दिले. या प्रशिक्षणात हिंगोली जिल्ह्यातील जवळपास १०० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. मान्सुनपुर्व तयारीसाठी औंढा येथील (Aundha Irrigation lake) लघुपाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे व बचाव प्रशिक्षण आयोजित करण्यात आले .