गडचिरोली (Gadchiroli dead body) : गडचिरोली येथील मूल मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या विरुद्ध दिशेने असलेल्या गटारात एक मृतदेह गटारात आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. यामागे घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत असून घटनास्थळावर बघ्यांची प्रचंड गर्दी उसळली आहे.
जिल्हा परिषदे चा एक कर्मचारी तीन दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यात आहे. पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा सुरू केला असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.