परभणी/गंगाखेड (Parbhani) :- शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदी (Godawari River) पात्रात सोमवार 28 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बालाजी (माणिक) माधव बोबडे असे मृताचे नाव आहे.
गोदावरी नदी पात्रातील पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची घटना
परभणीच्या गंगाखेड शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची घटना सोमवार 28 एप्रिल रोजी उघडकीस आली. गोदावरी नदी पात्रातील धारखेड पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने दुपारी 1 वाजेच्या सुमारास पोलीस पाटील सखाराम चोरघडे यांनी सदरची माहिती पोलीस ठाण्यात दिली. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन सहा. पोलीस अधिक्षक ऋषिकेश शिंदे, सपोनि सिद्धार्थ इंगळे, डिबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक असद शेख, पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, जमादार शंकर कामावाड, जमादार मारोती माहोरे, पो. शि. राहुल राठोड, संग्राम नलबले, चालक पुरुषोत्तम मुलगीर आदींनी घटनास्थळी धाव घेत येथे उपस्थित इम्रान पिर बाबा शेख, अझहर शेरदिल खान आदी नागरिकांच्या मदतीने पाण्यातील मृतदेह पाण्याबाहेर काढला असता हा मृतदेह धारखेड येथील बालाजी (माणिक) माधव बोबडे वय 32 वर्ष याचा असल्याचे समजल्याने त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आला.