देशोन्नती वृत्तसंकलन
परभणी (Parbhani cotton) : जिल्ह्यात यंदा कापसाचे तब्बल एक लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी प्रस्तावित असून शेतकऱ्यांनी यंदा (cotton seed) कापसाला पसंती दिली आहे. त्यामुळे कपाशीच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या एजंटांची फौजच खेड्यापाड्यात फिरत आहे. ॲडव्हान्स बुकिंग द्वारे शेतकऱ्यांकडून लुटीची अफलातून शक्कल ते लढवत आहेत. त्यामुळे कपाशीचे बोगस बियाणे (Bogus seed) विकणारे रॅकेटच जिल्ह्यात सक्रिय झाले की काय? अशी साशंकता निर्माण होत आहे. या सर्व गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ॲडव्हान्स बुकिंगद्वारे लुटीची अफलातून शक्कल
खरीप हंगामाला तब्बल दीड महिन्याचा अवकाश असून (cotton seed) कपाशी बियाण्यांचा अधिकृत विक्रेत्यांकडे अद्याप बियाणे प्राप्त नसले तरी कंपन्यांचे एजंट म्हणून भासवत त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून बियाण्याची ऍडव्हान्स बुकिंग मोहीम उघडली असल्याची माहिती आहे. यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होणारी कापसाची लागवड लक्षात घेता कपाशी बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता लक्षात घेता कंपन्यांचे हे कथित एजंट ऑर्डर नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांवर फासे टाकत आहेत. दरम्यान हंगामापूर्वी (Bogus seed) बियाणे कंपन्यांचे एजंट अधिकृत विक्रेत्याकडे येतात.
कंपन्यांच्या नावावर एजंटांची फौज खेड्यापाड्यात
बियाणे विक्रीची ही पद्धत पूर्वापार चालत आली आहे. तथापि यंदा कंपन्यांचे एजंट बियाण्यांच्या ॲडव्हान्स बुकिंग साठी खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या दारापर्यंत कसे? यामध्ये काहीतरी काळे-बेरे असण्याला वावच नव्हे तर पुष्टी मिळत आहे. या एजंटांकडून (cotton seed) कपाशीचे बोगस बियाणे माथी मारल्या जाणार नाही ना ?अशा शासंकेसह शेतकऱ्यांत भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या सर्व गंभीर बाबीकडे कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळावी अशी मागणी जोर करीत आहे.
कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बोगस बियाण्यांमुळे (Bogus seed) शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. खरीप हंगामात (Kharif season) शेतकऱ्यांना बोगस निविष्ठा विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर तसेच एजंटांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने आकस्मिक तपासणी करून बोगस बियाणे, खते, कीटकनाशके विक्रेत्यांवर कडक कारवाई करून अहवाल सादर करण्याचे नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या खरीप जिल्हास्तरीय आढाव्यात आदेश दिले होते. आता गावोगावी फिरणाऱ्या या बोगस एजन्टांवर प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.
कृषी विभाग अनभिज्ञ ?
गेल्या काही दिवसांपासून (cotton seed) कपाशी बियाण्याच्या ॲडव्हान्स बुकिंग साठी कंपन्यांचे कथित एजंट खेड्यापाड्यात धुमाकूळ घालीत असले तरी, याबाबत कृषी विभाग अनभिज्ञ कसा? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत असून कृषी विभागाने याकडे लक्ष द्यावे. अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे.