पोलीस अधीक्षकांसह पोलिसांचा ताफा तैणात
कोरपना (Bomb found) : तालुक्यातील औद्योगिक नगरी म्हूणन प्रसिध्द असलेल्या गडचांदूर शहरात आज मंगळवार दि. ३० जुलै रोजी एैन आठवडी बाजारच्या दिवशी बसस्थानक परिसरातील भगवती एन एक्स या कापडाच्या दुकानात एका पिशवीत (Bomb found) बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने गडचांदूर शहरात एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांना माहिती देताच (Gadchandur police) पोलिसांनी ती पिशवी बाहेर काढून चंद्रपूर येथून बॉम्ब स्कॉटला पाचरण केले असून वृत्त लिहेपर्यंत कारवाई सुरुच होती.
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन घटना स्थळी दाखल झाले असून भगवती कॉम्पेक्स परिसर सील करण्यात आले आहे. (Gadchandur police) गडचांदूर व कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असून त्या पिशवीत असलेली बॉम्ब सदृश्य वस्तू काय असेल हे बघण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली होती.
पिशवी ठेवणारा सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद
मंगळवारी दुपारच्या सुमारास एक तरुण तोंडाला व डोक्याला कपडा बांधून दुकानाच्या डाव्या बाजूच्या पायर्या चडून दुकानाच्या काउंन्टर काचेच्या अगदी जवळ एक पिशवी ठेवताना दिसत आहे. सोबतच तो उजव्या बाजूच्या पायर्या उतरून निघतानांही दिसत आहेत.
बॉम्बची भ्रमनध्वनी वरून मिळाली माहिती
भगवती एन एक्स कापडाचे दुकान मालक शिरीश बोगावार यांना दुपारी १ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाने फोन करून माहिती दिली की तुमच्या दुकानात एका पिशवीत काय आहेत बघून घ्या, मात्र पहिल्यांदा आलेल्या फोनवर दुकान मालक यांनी दुर्लक्ष केले. मात्र परत काही वेळात त्यांना दुसर्यांदा फोन आला असता तुम्ही (Bomb found) पिशवी खोलून पाहिली का? तुमच्या दुकानात काहीही अनर्थ घडू शकतो अशी भीतीदायक माहिती दिली असता त्या पिशवीचा सीसीटिव्ही च्या माध्यमातून शोधाशोध घेतला व दुकान मालकाने याची माहिती (Gadchandur police) पोलिसांना देऊन पिशवी दुकानाबाहेर काढली.