नवी दिल्ली (Bomb threat Case) : आज पुन्हा एकदा दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आज सकाळी सहा शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. अग्निशमन दल आणि (Delhi Police) पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या तरी काहीही संशयास्पद आढळले नाही. माहितीनुसार, पहाटे 4.30 वाजता पहिला कॉल आला, त्यानंतर दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. (Bomb threat Case) फोन तसेच ईमेलच्या माध्यमातून धमक्या देण्यात आल्या आहेत.
#WATCH | Delhi: Team of Dog squad, fire officials leave after checking the premises of Delhi Public School, East of Kailash. A total of 6 schools in Delhi received bomb threat emails today: Delhi Fire Service
"Nothing has been found", says a police official. pic.twitter.com/YarNeoWmMj
— ANI (@ANI) December 13, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, कैलासच्या पूर्वेला असलेल्या डीपीएस, सलवान स्कूल आणि केंब्रिज स्कूलला (Bomb threat Case) बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. शाळेत स्फोटके असल्याची माहिती देण्यासाठी हा मेल असल्याचे धमकीच्या ईमेलमध्ये म्हटले आहे. त्यांनतर शाळेत प्रवेश केल्यावर मुलांच्या दप्तरांची तपासणी केली जात नाही.
या आधीही दिल्लीत अनेकवेळा शाळांना (Bomb threat Case) बॉम्बने उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय विमान कंपन्यांनाही विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अलीकडच्या काळात दिल्लीत असे अनेक धमकीचे फोन आणि ईमेल आले आहेत. मात्र, आतापर्यंत हे सर्व बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे.
#WATCH | Delhi | Visuals from outside of Delhi Public School, East of Kailash – one of four schools that received bomb threats, via e-mail, today morning
Bomb detection team, fire officials present at the spot. pic.twitter.com/lhqR7avJqU
— ANI (@ANI) December 13, 2024
याआधी 8 डिसेंबरलाही दिल्लीतील ४० हून अधिक शाळांना (Bomb threat Case) बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. यामध्ये आरके पुरम येथील डीपीएस आणि पश्चिम विहार येथील जीडी गोएंका स्कूलचा समावेश आहे. कॅम्पसमध्ये बॉम्ब पेरण्यात आले होते आणि त्याचा स्फोट झाला तर मोठे नुकसान होईल, असा दावा या धमकीच्या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्फोट थांबवण्यासाठी 30 हजार डॉलर्सची मागणी केली होती.
धमकी मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने मुलांना घरी परत पाठवले. याबाबत पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने शाळांचा (Bomb threat Case) शोध घेतला. मात्र, या काळात काहीही संशयास्पद आढळले नाही.