सेंदूरवाफा (Farmer Suicide Case) : साकोली तालुक्यातील बोरगांव येथील शेतकर्याने कर्जबाजारीपणामुळे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि.११ जानेवारी २०२५ रोजी उघडकीस आली आहे. पुंडलिक वासुदेव डोंगरवार (५५), असे (Farmer Suicide Case) आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे.
बोरगाव येथील शेतकरी पुंडलीक डोंगरवार यांनी शेतीसाठी विविध ठीकाणाहून कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते फेडू शकत नसल्याने ते अनेक दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. त्यांच्या पत्नीचे देखील दीड वर्षापूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले होते. तेव्हापासून त्यांची आर्थिकस्थिती आणखी खालावली होती. आर्थिक विपन्नावस्थेत त्यांनी दि.११ जानेवारी रोजी स.७.३० वाजता आपल्या मुलाला ट्रॅक्टरसाठी डिझेल आणण्याकरीता पेट्रोलपंपावर पा’वले व घरी कोणी नसल्याची संधी साधून घरातील गो’्याच्या शेडमध्ये नायलान दोरीने गळफास लावून (Farmer Suicide Case) आत्महत्या केली. लक्षात आल्यानंतर गावकर्यांनी पोलिसांना व तहसिलदारांना सूचना दिली.
मृतकाच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीतील उल्लेखावरून कर्जबाजारीपणामुळे ही आत्महत्या झाली असल्याचे निष्पन्न झाले. साकोली येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह बोरगाव येथे आणण्यात आला. त्याचदिवशी दुपारी २ वाजता बोरगाव येथील स्मशानभूमित पुंडलिक डोंगरवार यांच्या (Farmer Suicide Case) मृतदेहावर अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यूपश्चात दोन मुले, एक सून, नातू असा परिवार आहे. पुंडलिक डोंगरवार यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर आघात झाला आहे. गावात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.