Patur:- दिनांक 22 जुलै सोमवार रोजी पातुर पंचायत समितीच्या महात्मा फुले सभागृहात शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात आमदार नितीन देशमुख यांनी आढावा बैठक आयोजित केली होती सदर बैठकीला तहसील कृषी व संबंधित विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या समक्ष पिक विमा कर्मचाऱ्यांना केले पोलिसांच्या हवाली
पातुर तालुक्याच्या घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये खूप मोठा घोळ समोर आल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी बोलून दाखवले पातुर तालुक्यामध्ये खरीप च्या पिकाचे 43 हजार 213 काष्टकऱ्यांनी पिक विमा भरला त्यामध्ये तक्रारी फक्त 2950 दाखवण्यात आल्या तब्बल 15000 शेतकऱ्यांच्या तक्रारी यांनी गाहाड केल्या त्यांचे पंचनामेच नाहीत आणि रब्बी पिकाचे सुद्धा हीच स्थिती आहे. 20737 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आणि फक्त 6,158 शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे पिक विमा कंपनीचे म्हणणे आहे. त्यानंतर सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्याचे पुरावे दाखवले तरी सुद्धा कंपनीने त्यांचे अद्याप पर्यंत पंचनामे केले नाहीत.
पिक विमा कंपनीने तब्बल 15000 लोकांचे पंचनामे केले
सदर बैठकीमध्ये पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या काही शेतकऱ्यांना चक्क 155 रुपये इतका पिक विमा मिळाला तर सावरगाव येथील शेतकरी श्रीराम सखाराम चंदनशे यांनी पिक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पाचशे रुपये घेतल्याचा आरोप आमदारा समक्ष केला व पैसे घेतलेल्या कर्मचाऱ्याला प्रत्यक्षरीत्या ओळखले असे अनेक शेतकऱ्यांनी पैसे दिल्याचे निष्पन्न झाले. पिक विमा कंपनीने तब्बल 15000 लोकांचे पंचनामेच केले नाहीत. पंचनामे केले त्यातील काही लोकांना अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची रक्कम मिळाली नाही व कुठल्या प्रकारे व कशाच्या आधारे पंचनामे केले हे सुद्धा कर्मचारी सांगू शकले नाहीत यामुळे आमदार नितीन देशमुख यांनी सर्वांना धारेवर धरत जाब विचारत सभेमध्ये उभे केले त्यामुळे अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची पुरती तारांबळ उडाली व पैसे घेतल्याचे आरोपाखाली पिक विमा कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना पातुर पोलिसांच्या हवाली करण्यात आले, कृषी विभागातर्फे(agriculture department) शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारीवरून पातुर पोलीस स्टेशन येथे चौकशीसाठी पत्र देण्यात आले आहे वृत्तलेस तोवर पिक विमा कंपनीचे कर्मचारी पातुर पोलीस स्टेशन येथे होते.
शिवसेना उभाठा गटाचे असंख्य कार्यकर्ते शेतकरी उपस्थित
आधी शेतकरी (farmer) अस्मानी संकटाने हैराण असून शेतकऱ्यांवर एका मागे एक संकट येत आहेत त्यामुळे पिक विमा शेतकऱ्यांचा आधार होता. त्यामध्येच घोळ झाल्याने शेतकरी पुरता घायाळ झाला आहे. यावेळी आमदार नितीन देशमुख तहसीलदार राहूल वानखडे गटविकास अधिकारी अघडते , राज्य शासनाचे कृषी अधिकारी, पिक विमा कंपनीचे कर्मचारी, प स चे कृषी अधिकारी जयंत सोनवणे,उपजिल्हाप्रमुख योगेश वानखडे तालुका प्रमुख रवींद्र मुर्तडकर शहर प्रमुख निरंजन बंड उपजिल्हाप्रमुख सागर रामेकर प स सदस्य गोपाल ढोरे एडवोकेट झडपे,परशराम उंबकार सागर कढोंणे अजय पाटील आनंद तायडे गणेश घुगे अनिल निमकंडे अंबादास देवकर अजबराव चव्हाण दीपक देवकर रवी काकड यासह यांचा शिवसेना उभाठा गटाचे असंख्य कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.