मानोरा (Washim):- मानोरा पोलीस स्टेशन (Police Station) अंतर्गत येणाऱ्या एका गावातील १६ वर्षीय बालिकेवर जबरदस्ती अत्याचार केल्याप्रकरणी दि. २९ ऑगस्ट रोजी पिडीत बालिकेच्या फिर्यादीवरून दोघाविरुद्ध पोलीसांनी कलम ६४ ( २ ), ( २ ) ( एम) ३ ( ५ ) भा. न्या. स. सहकलम ४, ६ बाल नुसार गुन्हा दाखल केला आहे.
बालिका ११ वी कॉलेज मध्ये शिक्षणासाठी मानोरा येथे येत
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहिती पिडीत बालिका ११ वी कॉलेज मध्ये शिक्षणासाठी मानोरा येथे येत होती. माझी आई व मी शेतमजुरीचे काम करतो. जन्मापासून आई, भाऊ व मी मामाच्या गावी वास्तव्याला आहे. मागील ४ महिन्यापूर्वी मानोरा येथील बस स्थानक येथे पाशा फारुक शेख वय २६ यांच्यासोबत ओळख झाली. तेंव्हापासून मी त्यांच्यासोबत बोलत होते. अंदाजे एका महिन्यापूर्वी मी, माझ्या आई सोबत शेतात कामाला गेली होती. घरी आल्यावर माझी रात्री घरात जेवण करून झोपलो. मी ओसरीत झोपली असताना रात्री १२ वाजताच्या सुमारास माझ्या ओळखीचा पाशा फारुख शेख माझ्या घरी आला. त्याने मला झोपेतून उठवून तुझ्याशी बोलायचे आहे, तेंव्हा एवढ्या रात्री तू कसा काय घरी आला असे विचारले असता तुझी आठवण आली आहे. तुझ्यासोबत मला लग्न करायचे आहे, असे सांगून माझी इच्छा नसतानाही माझ्यासोबत शारीरिक संबंध(Physical relationship) रात्रभर थांबून सकाळी ४ वाजता घरून निघून गेला.
काही दिवसांनी माझी आई कामाला गेली असताना आरोपी पाशा फारुक शेख व त्याचा मित्र शहेबाज खान शहीद खान वय २३ हे दोघेही घरी आले. मित्राला बाहेर थांबवून पुन्हा त्याने संबध बनविले. त्यानंतर पाशा शेखने मला, मंगरूळपिर येथे बोलावले. आम्ही दोघे बसने मंगरुळपिर येथे आलो. तेथील बस स्थानक येथे पोलीसांनी पाहून ठाण्यात आणले. सदर प्रकरणाच्या बालिकेच्या फिर्यादीवरून मानोरा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.