सेनगाव तालुक्यातील चोंडी बु. येथील घटना
दोघांना वनविभागाने सुनावली पोलिस कोठडी
कनेरगाव नाका/सेनगाव (Forest Department) : तालुका वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहिती वरून ४ ऑक्टोबर शनिवार रोजी मध्यरात्री दोघा जणांना सेनगाव तालुक्यातील चोंडी बु.येथे जिवंत मांडूळ सापासह पकडले न्यायालयाल-ने आरोपींना दोन दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.
तालुका वन विभागाला गोपनीय मिळालेल्या माहिती वरून सेनगाव तालुक्यातील चोंडी बु.येथे आरोपी ओम विलास भाकरे रा. चोंडी बु. व .काशिनाथ विश्वनाथ गोरे रा. सोनखास ता.जि.वाशिम यांनी एक जिवंत मांडूळ साप अनाधिकृतपणे पकडल्याची त्याला माहिती मिळाली. (Forest Department) वन विभागाच्या पथकाने दोघाना ताब्यात घेतले.
यावेळी एक जिवंत मांडूळ साप त्याच्या नैसर्गिक अधिवासात न सोडता आणि याबाबत वन अधिकार्यांना कोणतीही कल्पना न देता स्वतः जवळच बाळगून ठेवल्याचे चौकशी दरम्यान आढळून आले तेव्हा वन अधिकार्यांनी आरोपी-कडून जिवंत मांडूळ सापासह एक स्कुटी व एक पल्सर मोटरसायकल जप्त करून दोघा आरोपींना पुढील तपासासाठी ताब्यात घेऊन ५ ऑक्टोबर रविवार रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना ६ रोजी पर्यंत वन कोठडीचे आदेश सुनावले आहेत.
सदरील वन गुन्ह्याचा पुढील तपास माधव केंद्रे वनपरिक्षेत्र अधिकारी सेनगाव हे करीत आहेत. (Forest Department) सदर कार्यवाही डॉ. राजेंद्र नाळे साहेब विभागीय वन अधिकारी हिंगोली, सचिन माने सहायक वंनसंरक्षक हिंगोली यांच्या मार्गदर्शना-खाली माधव केंद्रे वनपरिक्षेत्र अधिकारी सेनगाव, जी. पी. मिसाळ वनपाल, शिवराम चव्हाण वनपाल, आसाराम उबाळे, वनरक्षक पातोंडा, विकास कांडेलकर वनरक्षक खेर्डा, आर. मुदीराज वनरक्षक, पि.टी. केंदळे वनरक्षक हानकदरी , जी. आर. घुगे वनरक्षक खिल्लार, सुनील तनपुरे वनरक्षक जामदया, महादू शिंदे वनरक्षक तांदुळवाडी, बबन राठोड वनरक्षक वडहिवरा आणि वनसेवक यांनी पार पाडली.
