परभणी/गंगाखेड (lightning death) : वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसात (lightning death) वीज कोसळल्याने तेरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना दिनांक १० जून सोमवार रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास तालुक्यांतील धारासुर शिवारात घडली आहे.
परभणीच्या धारासुर शिवारातील घटना
गंगाखेड तालुक्यातील काही भागात पावसाचे आगमन झाल्याने सरकी लावण्याची लगबग सुरू झाली. शेतकरी बांधव कुटुंबासह शेतात जात आहे. दिनांक १० जून सोमवार रोजी धारासुर येथील वसंत राठोड यांचे कुटुंब शेतात सरकी लावतांना सरकी बियाणे संपल्याने बांधावर ठेवलेले सरकी बियाणे आई वडिलांकडे नेऊन देत आसताना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडडाटात अचानक आलेल्या पावसात अक्षय वसंत राठोड या तेरा वर्षीय मुलाच्या अंगावर दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास अचानक (lightning death) वीज कोसळली. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या अंगावर विज पडताच आई वडिलांनी फोडलेला हंबरडा ऐकूण धावत आलेल्या नातेवाईक व अन्य ग्रामस्थांनी अक्षय राठोड यास गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात (Gangakhed Hospital) दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषीत केले. या घटनेमुळे धारा सुर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.