खरबी/नाका येथील दुर्दैवी घटना
भंडारा (RTO vehicle Accident) : जिल्ह्यातील जवाहरनगर पोलिस स्टेशन हद्दीतील खरबी/नाका येथे सायंकाळी धक्कादायक व दुर्दैवी घटना घडली. आरटीओ वाहनाच्या धडकेत अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. पूर्वांश रामकृष्ण वंजारी असे मृत पावलेल्या निरागस बालकाचे नाव आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसात काशिद मिर्झा या कंत्राटी वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या (RTO vehicle Accident) घटनेमुळे खरबी परिसरात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.