रिसोड(Risod) :- प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता पक्षाचा प्रचार बॅनर(banner) घरावर लावल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी रिसोड पोलिसात(Risod Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणूक फिरते पथकातिल राधेश्याम शालिग्राम दुबे या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आज दिनांक 23 एप्रिल रोजी ते आपल्या अन्य कर्मचाऱ्यासह फिरत असताना दुपारी 2 वा रिसोड तालुक्यातील निजामपूर येथील जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळे लागत असलेल्या एका घरावर काँग्रेस पक्षाचा (Congress party) प्रचार बॅनर आढळून आला. याबाबत घर मालकाला परवानगी बाबत विचारले असता कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे कळाले. सदर कर्मचाऱ्यांनी बॅनर काढून ताब्यात घेतले या प्रकरणी पोलिसांनी कलम 3 व भादवी 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.